लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : उन्हामुळे रसाळ फळांच्या मागणीत वाढ झाली असून, मोसंबी, लिंबांच्या दरात वाढ झाली. बहुतांश फळभाज्या, तसेच पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून घेवडा आणि पावटा प्रत्येकी ३ टेम्पो, २ टेम्पो भुईमूग शेंग, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ५ टेम्पो शेवगा, राजस्थानातून १० टेम्पो गाजर, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून मिळून १५ ट्रक मटार, मध्य प्रदेशातून १५ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ५०० गोणी, भेंडी ७ टेम्पो, गवार ५ टेम्पो, टोमॅटो १० हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, काकडी १० टेम्पो, कोबी ७ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांदा १२५ ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ३० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

मार्केट यार्डातील फळबाजारात लिंबू, मोसंबीच्या दरात वाढ झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने रसाळ फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. मोसंबीची आवक वाढ झाली. नव्या बहरातील मोसंबीचे दर पाच ते दहा टक्क्यांनी वाढले आहेत. रविवारी फळबाजारात ९०० ते एक हजार गोणी लिंबे, अननस ६ टेम्पो, जुन्या आणि नव्या बहारातील मोसंबी मिळून ३५ ते ४० टन, संत्री २० ते २५ टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई १२ टेम्पो, चिकू १५ ते २० टन, पेरू तीन हजार प्लास्टिक जाळी, सफरचंद एक हजार ते १२०० पेटी, आवळा तीन टन, बोरे १५० गोणी, खरबूज चार हजार प्लास्टिक जाळी, द्राक्षे १५ टन अशी आवक झाली.

पालेभाज्यांचे दर स्थिर

पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. तरकारी विभागात कोथिंबीर दीड लाख जुडी, मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली., अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- ८०० ते १०००, मेथी -७०० ते ८००, शेपू – ६०० ते ७००, कांदापात- ७०० ते ८००, चाकवत – ६०० ते ८००, करडई- ६०० ते ८००, पुदिना – ३०० ते ४००, अंबाडी – ५०० ते ६००, मुळे – १२०० ते १५००, राजगिरा- ७०० ते ८००, चुका – ६०० ते ७००, चवळई- ६००-७००, पालक- ७००- ८००, हरभरा गड्डी – ६०० ते ७००

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for juicy fruits increases due to heat prices of citrus fruits lemons increase pune print news rbk 25 mrj