पुणे : गेल्या काही दिवसांत तापमान वाढल्याने चांगलाच उकाडा होत आहे. त्यामुळे खरबूज आणि कलिंगडांना मागणी चांगली आहे. तसेच बहुतांश फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
पुणे जिल्ह्यासह सोलापूर, औरंगाबाद, कोकण आदी भागांतून गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात फळांची आवक झाली. त्याशिवाय केरळमधून ६ ट्रक अननस, संत्री ५ ते ६ टन, मोसंबी २५ ते ३०० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई १० ते १५ टेम्पो, लिंबे १७०० ते बावीसशे गोणी, कलिंगड ३० ते ४० टेम्पो, खरबूज २० ते २५ टेम्पो ,पेरू ६०० ते ७०० प्लॅस्टिक जाळी (क्रेट्स), चिकू दीड ते दोन हजार डाग, तसेच हापूस आंबा दोन हजार पेटी अशी आवक झाली. चिकू, पपईच्या दरात घट झाली आहे.
हेही वाचा – पुणे : मासळी, चिकनचे दर वाढले
लिंबांच्या मागणीत घट
बाजारात आवक झालेली लिंबे रसदार नाहीत. त्यामुळे लिंबांच्या मागणीत घट झाली आहे. लिंबांच्या एका गोणीच्या दरात दीडशे ते दोनशे रुपयांनी घट झाली आहे.