पुणे: थंडी सुरू झाल्यानंतर बाजारात हुरडा दाखल झाला आहे. खवय्यांकडून हुरड्याला चांगली मागणी आहे. मार्केट यार्डातील फळ बाजारात छत्रपती संभाजीनगर, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हुरडा विक्रीस पाठविला आहे. थंडी सुरू झाल्यानंतर हुरड्याची आवक सुरू होते. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातून दररोज २०० ते ३०० किलो हुरड्याची आवक होत आहे.
घाऊक बाजारात एक किलो हुरड्याची विक्री १८० ते २५० रुपये दराने केली जात आहे. हुरड्याच्या दरात वाढ झाली नाही. येत्या पंधरा दिवसांत हुरड्याची आवक आणखी वाढेल, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील व्यापारी माऊली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर यांनी दिली.
हेही वाचा… महाबळेश्वरमध्ये ऑनलाइन हाॅटेल बुकिंग महागात; उच्चशिक्षित तरुणीची तीन लाखांची फसवणूक
घरगुती ग्राहकांसह हाॅटेलचालकांकडून हुरड्याला चांगली मागणी आहे. लोणावळा, कोकण भागातून हुरड्याला मागणी आहे. डिसेंबर महिन्यात हुरड्याचा हंगाम सुरू होतो. फेब्रुवारी महिन्यापर्यंत हुरड्याची आवक होत असते. सुरती आणि गूळभेंडी जातीचा हुरडा बाजारात उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून हाॅटेलचालकांकडून हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे हुरड्याला चांगली मागणी असून दर चांगले मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत, त्यांनी सांगितले.
चौकट घरीच करा हुरडा पार्टी
थंडी सुरू झाली, की हुरड्याला मागणी वाढते. हुरडा पार्टी करण्यासाठी पूर्वी अनेक जण सहकुटुंब ग्रामीण भागातील कृषी पर्यटन केंद्रात जायचे. गेल्या चार वर्षांपासून बाजारात हुरड्याची पाकिटे विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे घरीच हुरडा पार्टी साजरी करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. घरगुती ग्राहकांकडून पाकिटातील हुरड्याला चांगली मागणी आहे. पुणेकर खवय्यांकडून हुरड्याला मागणी मोठ्या प्रमाणावर असते. हंगामात दररोज एक हजार किलो हुरड्याची विक्री होते. थंडीत हुरड्याचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते, असे मार्केट यार्डातील व्यापारी माऊली आंबेकर, पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यात हुरडा लागवडीचा प्रयोग
नगर, संभाजीनगर जिल्ह्यातून हुरड्याची सर्वाधिक आवक होते. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी हुरडा लागवडीचा प्रयोग केला असून, हुरडा लागवडीला यश आले आहे.