पुणे : परदेशांत शिक्षण घेण्यास जाण्यासाठी अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना दिली जाणारी शिष्यवृत्ती त्वरित वितरित करावी, तसेच शिष्यवृत्ती धारकांची संख्या ७५ वरून २०० करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रथमेश आबनावे यांनी केली. विद्यार्थ्यांना प्रवेश, व्हिसा मिळवण्यात अडचणी येत असल्याने तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर
विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर प्रक्रिया ठरावीक मुदतीत पूर्ण करून योजनेचा भाग असलेले आगाऊ खर्च (ॲडव्हान्सेस), विमान शुल्क मिळावे आदी मागण्यांचे निवेदन आबनावे यांनी समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांना दिले. आबनावे म्हणाले, विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती न मिळाल्यास त्यांना प्रवेशाला अडचणी येतात. कप्रकारे शिक्षणाची संधी डावलण्याचाच हा प्रकार आहे. ही प्रक्रिया अधिक गतिमान करून विविध माध्यमांद्वारे जनजागृती करावी. योजनेतील क्लिष्ट अटी काढून ती अधिक सुलभ आणि पारदर्शक करावी. ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया, ऑनलाइन सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली. आयुक्त नाईकनवरे यांनी या निवेदनाची दखल घेत अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश दिले.