पिंपरी : खेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार, आमदार दिलीप मोहिते यांच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सुमित मच्छिंद्र मोहिते (वय २७, रा. शेल-पिंपळगाव, ता. खेड) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोबाईल क्रमांकधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंबेठाण येथील आर्जी प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक आश्विन गर्ग यांना अनोळखी व्यक्तीने शनिवारी दुपारी फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो आमदार दिलीप मोहिते बोलत असल्याची बतावणी केली. आम्हाला काही सहकार्य होईल का, आता अडचणीत आहे, असे म्हणून फोनवरील व्यक्तीने मदतीच्या नावाखाली गर्ग यांच्याकडे पैसे अथवा इतर मालमत्ता मागून फसवणुकीचा प्रयत्न केला. सहायक फौजदार मोरे तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand money from company owner in name of mla pune print news ggy 03 amy