पिंपरी : नाट्य परिषदेचा एक प्रतिनिधी विधिमंडळात असला पाहिजे. विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळाले पाहिजे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांना विधानपरिषदेची आमदारकी द्यावी. दामले तयार नसतील तर मी तयार असल्याचे सांगत नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी विधानपरिषदेची मागणी केली.
ऐतिहासिक शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची चिंचवड येथील श्री मोरया गोसावी संकुल येथे घंटा वाजली. ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या उपस्थितीत नटराज, घंटेचे पूजन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित आहेत.