पुणे / बारामती : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रविवारी बारामती येथे देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या समर्थकाचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा – Chandrakant Patil : पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं तर स्वीकारणार का? चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “माझं नेतृत्व मला…”

राज्याचे सलग सहावे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचा बारामती येथील शारदा संस्थेच्या प्रांगणात सत्कार झाला. त्यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. पवार यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा – कोंढव्यात दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून गोळीबार, पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा

मराठा सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आहे. देशमुख मराठा समाजाचे असल्यानेच ही हत्या झाली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते, मंत्री धनंजड मुंडे यांना त्यांचा अडसर ठरत होता. त्यामुळे मुंडे यांनी गुंडामार्फत हत्या केली आहे. धनंजय मुंडे हे गुन्हेगारांचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. तसेच या प्रकरणाचा तपास जलदगतीने करावा, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे सुनील सस्ते, ॲड. विजय तावरे, विकास खोत आणि सचिन शिंदे या पदाधिकाऱ्यांनी केली.