पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे पडसाद बुधवारी शहरात उमटले. शरद पवार समर्थकांकडून शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी भवनातील अजित पवार यांचे नाव असलेली कोनशिला फोडण्यात आली. त्यावरून अजित पवार आणि शरद पवार सर्मथकांमध्ये काही काळ वादावादी झाली. त्यानंतर शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी भवनावरील घड्याळ चिन्ह हटविण्यात आले. दरम्यान, शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध सभा घेत शरद पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून आगामी निवडणुकीत विरोधकांना पराभूत करण्याचा निर्धार करण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाचा ताबा आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे राहील, असा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिला होता. त्यानंतर शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस भवनात निषेध सभा झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा