पुणे : पावसाळ्याचा तोंडावर राज्यात डेंग्यूचा प्रार्दुभाव वाढला आहे. यंदा जानेवारी ते ७ मे या कालावधीत डेंग्यूचे १ हजार ७५५ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या दीडपट झाली असून, सर्वाधिक रुग्ण पालघर जिल्ह्यात आढळले आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर, अकोला, नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यांत रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात यंदा जानेवारी ते ७ मे या काळात डेंग्यूचे १ लाख २७ हजार १४० संशयित रुग्ण आढळले. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या ८१ हजार ७३१ होती. यंदा निदान झालेल्या डेंग्यू रुग्णांची संख्या १ हजार ७५५ आहे. गेल्या वर्षी ही संख्या १ हजार २३७ होती. गेल्या वर्षीचा तुलनेत रुग्णसंख्या यंदा दीडपट आहे. राज्यभरात यंदा १ लाख ८८ हजार ८३४ संशयित रुग्णांची डेंग्यूची चाचणी करण्यात आली आहे. यंदा राज्यभरात आतापर्यंत डेंग्यूमुळे एकही मृत्यू झालेला नाही. गेल्या वर्षी मात्र या कालावधीत एका रुग्णाचा मृत्यू झाला होता, अशी माहिती आरोग्य विभागाचे संहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.

हेही वाचा : राज्यात द्विलक्ष्यी अभ्यासक्रमांबाबत मोठा निर्णय… आता काय होणार? मुदतवाढ

राज्यात सर्वाधिक १७४ डेंग्यूचे रुग्ण पालघर जिल्ह्यात आढळले आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर जिल्हा ११७, अकोला जिल्हा ७१, नांदेड जिल्हा ५८, सोलापूर जिल्हा ५१ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यातील महापालिकांचा विचार करता मुंबई महापालिकेत सर्वाधिक २८५ रुग्णसंख्या आहे. त्याखालोखाल नाशिक महापालिका ७९, कोल्हापूर महापालिका ४५, सांगली महापालिका ४१ आणि पनवेल महापालिका ३८ अशी रुग्णसंख्या आहे.

आरोग्य विभागाचे जनजागृतीचे पाऊल

आरोग्य विभागाने राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जून हा हिवताप प्रतिरोध महिना जाहीर केला आहे. या महिन्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, झिका, चंडीपुरा आणि हत्तीरोग या आजारांविषयी समाजात जनजागृती केली जात आहे. याचबरोबर किटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आरोग्य विभागांकडून उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे, असे डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : मनगटापासून तुटलेला हात पुन्हा जोडला, ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून तरुणावर पुनर्रोपण शस्त्रक्रिया यशस्वी

आजार रोखण्यासाठी उपाययोजना

  • रुग्ण सर्वेक्षण
  • औषध फवारणी
  • डासोत्पत्ती ठिकाणी नष्ट करणे
  • आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण
  • परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती

हेही वाचा : ‘परिवहन’च्या कामकाजावर माजी आयुक्तांचेच बोट! मध्यस्थांसाठी यंत्रणा असल्याचा गंभीर आरोप

डेंग्यूचे जिल्हानिहाय रुग्ण

  • पालघर – १७४
  • कोल्हापूर – ११७
  • अकोला – ७१
  • नांदेड – ५८
  • सोलापूर – ५१
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue risk increased in state number of cases more than one and a half times compared to last year pune print news stj 05 css
Show comments