लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे: जगद्गुरु संतशिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून १० जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी २८ जून रोजी पंढरीत दाखल होणार आहे. वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे. यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून १० जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. २८ जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे आणि  देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी शनिवारी दिली. यंदा पालखी सोहळ्याचे ३३८ वे वर्ष आहे.

संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतीक्षा करत असतात. मागील वर्षी करोना महासाथीची लाट ओसरल्यानंतर पारंपरीक पद्धतीने वारी सुरू करण्यात आली होती. प्रस्थान ठेवल्यानंतर इनामदार वाड्यात पालखी सोहळा पहिला मुक्काम करणार आहे. संत तुकारामांची पालखी २८ जून रोजी पंढरीत दाखल होणार असून २९ जून रोजी आषाढी एकादशीच्या सोहळ्यात पालखी सोहळ्यातील वारकरी सहभाग घेणार आहेत. आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे.