पिंपरी : जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून २८ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. १९ दिवसांचा प्रवास करून हा पायी पालखी सोहळा १६ जुलै रोजी पंढरीत दाखल होईल. १७ ते २० जुलै रोजी हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे. वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३३९ वे वर्ष आहे.

याबाबतची माहिती देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली. पालखी सोहळा प्रमुख म्हणून विशाल मोरे, माणिक मोरे, संतोष मोरे महाराज यांची निवड करण्यात आली आहे. संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतीक्षा करत असतात. प्रस्थान ठेवल्यानंतर इनामदार वाड्यात पालखी सोहळा पहिला मुक्काम करणार आहे. संत तुकारामांची पालखी १६ जुलै रोजी पंढरीत दाखल होणार असून १७ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या सोहळ्यात पालखी सोहळ्यातील वारकरी सहभाग घेणार आहेत. आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
raj thackeray rally in thane
सत्ता आली तर मशिदीवरील भोंगे ४८ तासात उतरवेन ; राज ठाकरे
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक

हेही वाचा >>>‘अमित शहा यांचे शेतीसंबंधीचे ज्ञान मर्यादित’, शरद पवार यांचा टोला

पालखी सोहळ्याचा कार्यक्रम

२८ जूनला दुपारी दोन वाजता पालखी प्रस्थान होणार असून  पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात. २९ जूनला पालखी सोहळा आकुर्डीत मुक्कामी असणार आहे. ३० जूनला पालखी पुण्यात दाखल हाेणार असून दाेन दिवस नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असणार आहे. २ जुलैला पालखी सोहळा लाेणी काळभाेरला, ३ जुलैला, ४ जुलैला वरवंड, ५ जुलैला उडंवडी गवळ्याची, ६ जुलैला बारामती शारदा विद्यालय, ७ जुलैला सणसर पालखी तळ, ८ जुलैला पालखी आंथुर्णेत मुक्कामी असून बेलवाडीत दुपारी पहिले गाेल रिंगण हाेणार आहे.

९ जुलैला निमगाव केतकी, १० जुलैला इंदापूर पालखी तळावर मुक्काम असून दुपारी गाेलरिंगण हाेणार आहे. ११ जुलैला सराटी पालखी तळ, १२ जुलैला अकलूज माने विद्यालय पालखी तळावर मुक्कामी असून दुपारी गाेल रिंगण हाेणार आहे. १३ जुलैला बाेरगाव येथे मुक्कामी असून दुपारी माळीनगर उभे रिंगण हाेणार आहे. १४ जुलैला पिराची कुराेली, १५ जुलैला वाखारीला उभे रिंगण हाेणार आहे. १६ जुलैला श्री क्षेत्र पंढरपूर संत तुकाराम महाराज नवीन इमारत येथे पालखी साेहळा दाखल होणार असून याठिकाणी उभे रिंगण हाेणार आहे.  १७ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या सोहळ्यात पालखी सोहळ्यातील वारकरी सहभाग घेणार आहेत. चार दिवसांच्या पंढरीतील मुक्कामानंतर २१ जुलैला पालखी साेहळ्याचा परतीचा प्रवास सुरू हाेणार आहे.

पालखी साेहळ्यानिमित्त संत तुकाराम महाराज संस्थानाची जय्यत तयारी सुरू आहे. देहू ते पंढरपुर या पालखी मार्गावर वारीतील वारक-यांना विविध सुविधा देण्यासाठी एक महिना अगाेदर पालखी मार्गाची पाहणी केली जाणार असल्याचे पालखी साेहळा प्रमुख विशाल महाराज माेरे यांनी सांगितले.