लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला. मात्र, काही कारणांनी सुनेत्रा पवार यांचा अर्ज बाद झाल्यास खबरदारी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डमी अर्ज दाखल केला.

आणखी वाचा-मावळमध्ये ठाकरे गटात बंडखोरी? माजी विरोधी पक्षनेत्याने घेतला उमेदवारी अर्ज

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी किरण गुजर यांनी सुनेत्रा पवार यांच्या वतीने, तर अजित पवार यांच्या वतीने अमरेंद्र महाडिक यांनी उमेदवारी अर्ज नेला होता. सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री राज्यमंत्री रामदास आठवले आदी या वेळी उपस्थित होते. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार भिमराव तापकीर यांच्या उपस्थितीत पूरक अर्ज दाखल केला.

Story img Loader