राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. पुष्पांची उधळण आणि सोलापूरवरून मागवण्यात आलेला भला मोठा साडेपाचशे किलोच्या पुष्पहाराने रावेत मुकाई चौकात अजित पवार यांचं स्वागत करण्यात आलं. आज दिवसभर अजित पवार हे पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळाव्याला ते कार्यकर्त्यांना संबोधित करतील.

हेही वाचा… पिंपरी महापालिकेत शहर अभियंता पद आता नाममात्र, ‘हे’ आहे कारण

nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
police fired tear gas at shambhu border to stop march of protesting farmers
आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा; आठ शेतकरी जखमी, आंदोलन दिवसभरासाठी स्थगित
devendra fadnavis takes oath as chief minister of maharashtra for the third time
तीन ताल… फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी; शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, पवारांचा सहावा विक्रमी शपथविधी
Maharashtra CM Devendra Fadnavis Oath Ceremony Live Updates: Maha CM Fadnavis, dy CMs Shinde & Ajit arrive at Mantralaya,
अग्रलेख : सावली, सावट, सौजन्य, सावज!

पिंपरी- चिंचवड शहर हा गेली काही वर्षे अजित पवारांचा यांचा बालेकिल्ला मानला जात होता. गेली काही वर्ष इथे भाजपाने जम बसवला आहे, पिंपरी चिंडवड महानगरपालिकाही भाजपाच्याच ताब्यात आहे. आता अजित पवार हे भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाल्याने स्थानिक राजकीय समीकरणे पुर्णपणे बदलली आहेत. त्यातच या शहरामध्ये देखील अजित पवार गट आणि शरद पवार गट बघायला मिळत आहे. पाच वर्षांचा कालावधी संपल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होणे बाकी आहे. असं असतांना आता या शहरांत अजित पवार काय राजकीय भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असेल.

हेही वाचा… पुणे : वाहनचालकांवरील थकीत दंड होणार कमी, पोलीस करणार ‘अशी’ तडजोड

शिवसेना, भाजपचे खासदार, आमदार बैठकीला उपस्थित राहणार का?

अजित पवार शहरात आले की शिवसेना, भाजपवर सडकून टीका करत होते. भाजपच्या महापालिकेतील कारभारावर प्रश्न निर्माण करत होते. त्याला भाजपकडूनही उत्तरे दिली जात होती. आता पवार शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनासोबत होणाऱ्या बैठकीला शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजप आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे उपस्थित राहणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader