पिंपरी : पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरणाच्या विषय दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. आता फक्त एका मंत्र्यांची स्वाक्षरी बाकी आहे. मी दिल्लीला गेल्यानंतर संबंधितांना भेटून त्यांची स्वाक्षरी घेणार आहे. त्यामुळे शहरवासीयांचे निगडी ते कात्रज मेट्रोचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पडणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, मी कामाचा माणूस आहे. त्यामुळे राज्यातील विविध प्रश्‍नासंदर्भात बैठका घेतो, कामाची माहिती घेतो, अडचणी जाणून घेतो, त्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्न करतो. पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरणाच्या विषय दिल्लापर्यंत पोहोचला आहे. फक्त आता एका मंत्र्यांची स्वाक्षरी बाकी आहे. मी दिल्लीला गेल्यानंतर संबंधितांना भेटून त्यांची स्वाक्षरी घेणार आहे. त्यामुळे शहरवासीयांचे निगडी ते कात्रज मेट्रोचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पडणार आहे.स्वारगेटला मेट्रोसाठी भूमिगत काम करायचे आहे. त्या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याशिवाय पर्याय नाही. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी कामाला लागलो आहे.

हेही वाचा >>>…म्हणून गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावेळी गैरहजर होतो; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खुलासा

लालबागच्या राजाचा दिवसेंदिवस मोठा लौकिक वाढला आहे. त्यामुळे राजाच्या दर्शनासाठी अभिनेते, अतिमहत्त्वाचे लोक, सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. जागरूक गणराया आहे. मंडळाने अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी स्वतंत्र लेनची व्यवस्था केली आहे. गर्दी झाल्यानंतर मंडळाने व्यवस्था करणे तर भाविकांना सहकार्य करण्याचे काम पोलीस खात्याचे असते. त्यानुसार पोलीस सहकार्य करत आहेत. गणेशोत्सव, ईद त्यानंतर दसरा, दिवाळी या सणांचा पोलीस खात्यावर ताण येत असतो. मात्र, राज्य सरकार काळजी घेत असल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister ajit pawar statement regarding pimpri to nigdi metro expansion pune print news ggy 03 amy