पुणे : पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला महात्मा फुले मंडई येथील पुतळ्यापासून साडे दहा वाजण्याच्या सुमारास मानाचा पहिला कसबा गणपतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.मात्र त्यापूर्वी अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती,अखिल मंडई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेत आरती देखील केली.

तर त्यावेळी अजित पवार यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला असता ते म्हणाले की, राज्यातील जनतेने अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पांचं स्वागत केलं आणि आज बघता बघता ११ वा दिवस उजाडला आहे.आज गणपतीला निरोप देण्याची वेळ आली आहे.त्यामुळे एकच म्हणाव वाटत ते म्हणजे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणण्याची वेळ आली आहे.थोडंसं मन जड झाल आहे. आतापर्यंत सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं आहे विसर्जनाच्या दिवशी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Eknath Shinde is now Deputy CM and second ranked leader in Devendra Fadnavis government
एकनाथ शिंदेंचे सरकारमधील स्थान दुसऱ्या क्रमांकाचे, शिंदेंना ‘देवगिरी’

हेही वाचा >>>“माणूसपणाचा परीघ रुंदावत राहणे गरजेचे”, ज्येष्ठ कवी-गज़लकार रमण रणदिवे यांची भावना

मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता ते म्हणाले की, सर्व कार्यकर्त्यांना वाटत असते की,आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, पण सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होत असते असं होत नाही.पण मुख्यमंत्रीपदाबाबत १४५ चा मॅजिक आकडा पार करावा लागतो आणि दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मतदार राजाच्या हातात असते की कोणाला मतदान करायचं अशी भूमिका त्यांनी मांडली.

तसेच ते पुढे म्हणाले की,पहिल्यांदा महायुतीच सरकार आणण्याचा आमचं प्रयत्न असणार आहे. महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही सर्वजण बसून निर्णय घेऊ,तसेच आगामी विधानसभा निवडणुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader