पुणे : पुणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या टर्मिनलचे उद्घाटन रविवारी होत आहे. मात्र, पुढील तीन वर्षांत पुण्याला नवे विमानतळ नक्की होईल. चालू वर्षात या नव्या विमानतळाच्या भूसंपादनाचे काम सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे,अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.
विकसित भारत ॲम्बेसिडर, विकसित पुणे कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, ‘पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. पुणे करयाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, एवढ्यावरच न थांबता पुणेकरांनापुढील तीन वर्षात नवे विमानतळ मिळणार आहे. चालू वर्षात त्याचे भूसंपादनसुरू करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल.’दरम्यान, पुणे ते छत्रपती संभाजीनगर हरित महामार्ग तयार करण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यापासून संभाजीनगर येथे केवळ दोन ते अडीच तासांत पोहोचता येणार आहे. मी पुण्याच्या अधिकाधिक जवळ येण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, पुण्यातून निवडणूक लढविणार नाही, असे फडणवीस यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.