राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जहरी टीका केली आहे. लोक मनात येईल तसं कथानक करत आहेत. मान अपमानाचे खोटे अंक दाखवत असून ते नटसम्राट सारखे वागत आहेत. मात्र, नटसम्राट होता येत नाही. हे काही राजकारणातील लोकांना सुचवायच आहे. असं म्हणत त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये जाहीर सभेमध्ये बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जगतगुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहाचे उदघाटन झालं. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, शंकर जगताप आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुकोबांचे अभंग प्रेरणा देणारे असतात. संत तुकाराम महाराज म्हणतात.. गाढवाच्या अंगी चंदनाची उटी. राखे सवे भेटी केली तवे. याचा अर्थ फडणवीस यांनी समजून सांगितला. ते म्हणाले, गाढवाला चंदनाची उटी लावली तरी ते उकिरड्यात राख लावून घेणारच. हे मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला माहित आहे. हे सांगण्याची आवश्यकता नाही. अस ही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, कारण सध्याचा राजकिय धुराळा सुरू आहे. यात कोण आपल्या अंगाला धुराळा लावून घेत आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पुढे ते म्हणाले, तुकोबांच्या नावाने अतिशय छान नाट्यगृह बनवलं आहे. पण नाट्यगृहाच्या बाहेरच जास्त नाटकं सुरू झाली आहेत. लोकं मनात येईल तस कथाकथन करत आहेत. मान- अपमानाचे वेगवेगळे खोटे अंक होत आहेत. संशय कल्लोळ देखील चाललेला आहे. पण जनता सुज्ञ आहे. नटसम्राटा सारख वागल म्हणून नटसम्राट होता येत नाही. हे राजकारणातील काही लोकांना सुचवायचं आहे. तसे ते वागले तर कट्यार काळजात घुसणार आहे. त्याची वेदना त्यांना होणारच आहे. त्यांना माहिती आहे, की एकनाथ शिंदे यांनी डंपर पलटी केला आहे. असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला आहे.