पुणे : म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात देशातील पहिले ऑलिम्पिक भवन म्युझियम बांधण्यात येणार आहे. या इमारतीचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी झाले. ७२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये ऑलिम्पिक असोसिएशनची ६१ कार्यालये, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिक संग्रहालय, क्रीडा आयुक्त कार्यालय होणार आहेत.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा…पुणे : शाब्बास पोलीस! शाळकरी मुलीचा अपहरणाचा कट उधळला

अजित पवार म्हणाले, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या इमारतीचे काम लवकरात लवकर होण्यासाठी क्रीडा विभाग आणि असोसिएशन यांनी समन्वयाने काम करावे. या इमारतीमुळे खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळेल. ऑलिम्पिकच्या दृष्टीने १२ खेळांवर विशेष लक्ष देण्यात आले असून त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण देण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तालुका क्रीडा संकुल सुस्थितीत राहण्यासाठी लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष द्यावे.

Story img Loader