पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या लोकार्पण सोहोळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असून त्यापूर्वी त्यांनी रुबी हॉल क्लिनिक ते वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांसोबत संवाददेखील साधला.

पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे. त्या चौकामध्ये प्रवाशांना अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. त्या वाहतूक कोंडीमधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी सुसज्ज असा रस्ता आणि उड्डाण पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

mahayuti eknath shunde devendra fadanvis ajit pawar
मविआ सत्तेत आल्यास कल्याणकारी योजनांवर गदा; ‘रिपोर्ट कार्ड’च्या प्रकाशनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचा आरोप
IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने…
Ravindra Dhangekar Allegation, Radhakrishna Vikhe Patil,
महसूलमंत्र्यांच्या वरदहस्ताने पुनर्वसनाच्या जमिनीमध्ये २०० कोटींचा घोटाळा – आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप
local train new timetable
विश्लेषण: मध्य रेल्वे लोकलच्या नव्या वेळापत्रकाबाबत प्रवासी वर्ग नाराज का?
Ropeway project, Tadoba tiger reserve
ताडोबातील व्याघ्रदर्शनासाठी आता ‘रोपवे टूरिझम’…
Passengers upset, Kasara local time, Karjat local time,
शेवटच्या कसारा, कर्जत लोकलच्या वेळा बदलल्याने प्रवासी नाराज
thane pm Narendra modi security
पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी हॉटेल, इमारतींची पोलिसांकडून तपासणी; सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
Solapur flight service will be launched tomorrow by the Prime Minister Narendra modi
सोलापूर विमानसेवेचा पंतप्रधानांच्या हस्ते उद्या प्रारंभ

हेही वाचा – पुणे: भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी पुन्हा नाराज, निमित्त…

हेही वाचा – ‘आयसिस’च्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार; पुण्यातून आणखी एकास अटक, राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई

या कार्यक्रमापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील प्रास्तावित मेट्रोसह दुमजली उड्डाणपुलाच्या कामाबाबत अजित पवार यांनी पुणे स्टेशन येथील विधान भवन येथे अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीनंतर चांदणी चौकातील कार्यक्रमाच्या ठिकाणी अजित पवार यांनी रुबी हॉल क्लिनिक ते वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यान अजित पवार यांनी नागरिकांशीदेखील संवाद साधला.