पदाचा गैरवापर करून ४८ लाख रूपयांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी एसकेएफ कंपनीतील उपव्यवस्थापकाला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.योगेश मोहनराव भोसले (वय-३७, रा. डांगे चौक, थेरगाव) असे या उपव्यवस्थापकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले हे चिंचवडच्या एसकेएफ कंपनीचे प्रशासन व सुविधा या विभागाचे उपव्यवस्थापक होते.
हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताच्या प्रकल्पांना ‘राष्ट्रवादी’कडून खोडा; भाजपाचा आरोप
कंपनीने दिलेल्या पदाचा गैरवापर करून ६ एप्रिल ते ६ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत त्यांनी ४८ लाख ५७ हजार रूपयांचा अपहार केला. याबाबतची तक्रार कंपनीने केल्यानंतर भोसलेला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मोरे पुढील तपास करत आहेत.