चिंचवड विधानसभा निवडणुक जाहीर होताच पिंपरी- चिंचवड शहरात राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यलयीन बैठक पार पडली. चिंचवड विधानसभा लढवणार असल्याचे सर्वानुमते ठराव या बैठकीत झाला आहे. घड्याळ या पक्षाच्या चिन्हावर ही विधानसभा लढवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पदाधिकारी भेटणार असून सविस्तर बोलणार आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “धर्मवीर शब्दावरून राजकारण होतंय”, संभाजी राजेंची भूमिका, मोदींना म्हणाले, “तुम्ही छत्रपतींचे..”

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राजेंद्र जगताप यासह इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा- ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहंनी बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करावी’; पुण्यातील कुस्तीगीराची मागणी

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. लक्ष्मण जगताप हे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने आमदारकीची जागा रिक्त झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने चिंचवड पोटनिवडणूक जाहीर केली आहे. भाजपा लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप पैकी एकाला उमेदवारी देण्याची शक्यता आहे. हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस देखील पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतण्याची तयारी सुरू केली आहे. आज राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची पोटणीवडणुकी संदर्भात बैठक पार पडली. ही निवडणूक लढवण्यावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आग्रही आहेत. शहरात भाजपची पायमुळे वाढत असल्याने त्याला अटकाव घालण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. पदाधिकारी निवडणूक लढवण्यावर ठाम असून याबाबत लवकरच अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितले आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Desire of local ncp office bearers to contest chinchwad assembly by elections kjp dpj