लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: यंदा देशात विक्रमी गहू उत्पादन झाले आहे. केंद्र सरकारने गहू, रवा, मैद्याच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. गव्हाचा अतिरेकी साठा करण्यावर बंधने आहेत. तरीही देशांतर्गत बाजारात गव्हाच्या किमतीत मागील आठवडाभरात तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. २८ ते २९ रुपये किलोचा गहू ३० ते ३१ रुपयांवर गेला आहे.

onion prices loksatta news
कांदा स्वस्त; गृहिणींना दिलासा, आठवडाभरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी घट
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
onion export duty issues, onion prices, farmers
विश्लेषण : शेतकरी निराश, ग्राहकही हताश… कांदा खरेदी-विक्रीत मग नक्की कोणाचा फायदा?
Opposition protests in Legislative Assembly area on issue of getting guaranteed price for farmers
कापूस, धान, सोयाबीनच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, विधान भवन परिसरात…
sangli 144 ton sugarcane production
एकरी १४४ टन उसाचे उत्पादन, सांगलीतील सहदेव पाटील यांचा विक्रम
Onion prices drop by Rs 1500 per quintal in four days
कांदा…शेतकऱ्याला १५ रु., ग्राहकाला ८० रु.; चार दिवसांत दरांत क्विंटलमागे १५०० रुपयांची घसरण
wheat
गहू आणि खाद्यतेलाचे दर आणखी वाढणार? कारण काय? सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?
Paddy Growers, Gondia District, Paddy, 235 crore stuck,
२३५ कोटी शासनाकडे अडकले; गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादकांची कोंडी

गहू, उपपदार्थांचे व्यापारी, निर्यातदार अनुप शहा म्हणाले, की श्रावण महिन्यापासून सण-उत्सव सुरू होतात. गणेशोत्सव, दसरा, दिवाळीत रवा, मैद्याला मागणी वाढते. त्यामुळे खासगी मिलचालकांकडून कमी दर्जाच्या गव्हाला मागणी वाढते. या काळात भारतीय अन्न महामंडळाकडून (एफसीआय) मिलचालकांना गव्हाचा पुरवठा केला जातो.

हेही वाचा… जंगलांना आग लागण्याचे प्रमाण घटले

पण, यंदा एफसीआयकडून अपेक्षित गव्हाचा पुरवठा होत नसल्यामुळे मिलचालकांनी खासगी बाजारातून कमी दर्जाच्या गव्हाची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली आहे. परिणामी देशांतर्गत बाजारात आठवडाभरात ३० रुपयांहून कमी दराने विक्री होत असलेल्या गव्हाच्या किमतीत तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. २८ ते २९ रुपये दराने विक्री होणारा गहू ३० ते ३१ रुपयांनी विक्री होऊ लागला आहे.

हेही वाचा… कैदीच देणार आता कैद्यांना कायद्याचे ज्ञान!

बाजारात ३० रुपयांहून जास्त दराने विक्री होणाऱ्या दर्जेदार गव्हाच्या दरात सध्या कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, कमी दर्जाच्या गव्हाच्या दरात वाढ झाल्याने दर्जेदार गव्हाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकार एफसीआयकडील गव्हाचा साठा खासगी बाजारात कसा आणते, त्यावरही गव्हाचे दर अवलंबून असतील.

एफसीआयचा गहू पुरवठा कमी

दर वर्षी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खासगी मिलचालकांकडून रवा, मैद्यासाठी गव्हाला मागणी वाढते. वाढीव मागणीनुसार एफसीआयकडून गव्हाचा पुरवठा केला जातो. यंदाही एफसीआयकडून गव्हाचा पुरवठा केला जात आहे, पण तो अपुरा आहे. त्यामुळे मिलचालकांनी खासगी बाजारातून खरेदी वाढवली आहे. त्यामुळे कमी दर्जाच्या गव्हाच्या दरात वाढ झाली आहे, असे गव्हाचे व्यापारी राजेश शहा म्हणाले.

Story img Loader