पुणे : शहरातील पदपथांवरून सहज चालता यावे, यासाठी महानगरपालिकेने ‘पादचारी सुरक्षा आणि सुविधा धोरण’ तयार केले असले, तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्यानेच पादचारी ‘रस्त्यावर’ आले असल्याचे शहरातील चित्र आहे. आठ वर्षांंनंतरही हे धोरण अंंमलबजावणीच्या प्रतीक्षेत असल्याने पादचाऱ्यांना पदपथावरून चालतानाही जीव मुठीत धरून जावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

‘पादचारी दिना’निमित्त केलेल्या पाहणीत शहरातील निम्म्याहून पदपथ हे अतिक्रमणाने व्यापले असल्याचे निदर्शनास आले आहे.पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी २०१६ मध्ये अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पादचारी धोरण तयार करण्यासाठी समिती स्थापन केली. मुख्य शहर अभियंता, उपप्रादेशिक परिवहन आधिकारी, वाहतूक पोलीस, अभ्यासक, तज्ज्ञ यांच्यामार्फत हे धोरण तयार करण्यात आले. या धोरणाला २३ ऑगस्ट २०१६ मध्ये मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

५७४ किलोमीटर लांबीचे पदपथ

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत एक हजार ४०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. या रस्त्यांलगत पादचाऱ्यांना विनाअडथळा चालण्यासाठी ५७४ किलोमीटर लांबीचे पदपथ आहेत. त्यांपैकी निम्म्याहून अधिक पदपथांंवर अतिक्रमण झाले आहे. शहरातील मध्यवस्तीतील कसबा पेठ, अप्पा बळवंत चौक, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता आदी ठिकाणी दुकाने, खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांनी पदपथ व्यापले आहेत.

हेही वाचा…पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी

पद्मावती, धनकवडी, सिंहगड रस्ता या परिसरात पदपथांंचे अस्तित्व दिसत नसल्याची स्थिती आहे. अनेक ठिकाणी रस्ते अरुंद असून, विद्युत जनित्र, पथदिवे, दुकानांचे फलक यामुळे पदपथ दिसेनासे झाले आहेत. जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, शिरोळे रस्ता आदी रस्त्यांवरील पदपथ पथारीवाल्यांनी व्यापले आहेत.

पादचारी भुयारी मार्ग बंद

नळ स्टाॅप चौक, जंगली महाराज रस्ता (माॅडर्न महाविद्यालयाजवळ), बिबवेवाडी (भापकर पेट्रोल पंपाजवळ) या ठिकाणी वाहतूककोंडी होत असल्याने महापालिकेने पादचारी भुयारी मार्ग तयार केले आहेत. मात्र, या भुयारी मार्गांचा वापर केला जात नसल्याने ते बंद आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे स्थानक येथील भुयारी मार्गांमध्ये दुकाने थाटल्याने पादचाऱ्यांना चालणे मुश्कील होत असल्याचे दिसून येते.

हेही वाचा…पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी

२० पादचाऱ्यांंचा मृत्यू

रस्ता ओलांडताना किंवा रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या १२० पादचाऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला असल्याचे ‘सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट’ या संस्थेच्या अभ्यासात निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी १०६ पादचाऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला असून, दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे संस्थेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे महापालिकेने पादचारी धोरण तयार केले आहे. त्याद्वारे मुंबई, दिल्ली, चंडिगढ आणि अनेक ठिकाणचे विशेष पुरस्कारदेखील घेतले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शहरात पादचारी दिन साजरा केला जातो. मात्र, हा दिन केवळ एक दिवस साजरा करून उपयोगाचे नाही. महानगरपालिकेचे पादचारी धोरण हे कागदावरच आहे. प्रशांत इनामदार, अध्यक्ष, पादचारी प्रथम संस्था

Story img Loader