श्री क्षेत्र पंढरपूरसाठी विशेष कृती आराखडा करण्याच्या सूचना दिल्या असून देहू-आळंदीचा विकासही याच पध्दतीने केला जाईल. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी आळंदीत बोलताना दिले. वारकरी सांप्रदाय हे महाराष्ट्राचे वैभव आहे, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे : तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीसाठी लवकरच बैठक ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

आळंदी येथील मृदंगज्ञान शिक्षण संस्था आयोजित मृदंग दिंडी आणि संत दासोपंत स्वामी गुरूपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मारूती महाराज कुऱ्हेकर, महंत पुरूषोत्तम दादा महाराज, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार दिलीप मोहिते, महेंद्र थोरवे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राला संतांची, वारकऱ्यांची महान परंपरा लाभलेली आहे. वारकरी सांप्रदाय ही मोठी शक्ती आहे. या संप्रदायाकडून मानवाच्या कल्याणाचा विचार दिला जातो. त्यानुसार, चांगले काम करत राहिले पाहिजे. खऱ्या अथाने महाराष्ट्राला अलोकिक संतपरंपरा लाभली आहे. इतर राज्यांना असे भाग्य लाभलेले नाही. जीवनातील नकारात्मकता घालवून सकारात्मकता पेरण्याचे तसेच मन ताजेतवाणे करण्याचे काम कीर्तन तसेच प्रवचनाने होते.