पुणे : प्रशासकीय कामकाज गतिमान आणि कागदविरहित (पेपरलेस) करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली विकसित करण्यास सुरुवात झाली आहे. नवीन वर्षापासून कार्य़ालयातील सर्व शाखांची कामे कागदविरहित करण्यात येणार असून, नागरिकांची दिवसेंदिवस रखडणारी कामे वेळेत मार्गी लागतील, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या धर्तीवर सरकारी कामकाजाच्या फाइलचा प्रवास चार स्तरांपर्यंत करण्यासाठी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सरकारी कार्य़ालयांमध्ये ई-ऑफिस प्रणालीचा अवलंब करण्यासाठी २०२२ मध्येच निर्देश दिले आहेत. त्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल, कुळकायदा, सर्वसाधारण, निवडणूक, गौण खनिज, पुनर्वसन, भूसंपादन, राजशिष्टाचार, नियोजन समिती, लेखा, राजशिष्टाचार, गृह, संजय गांधी निराधार योजना, नगर परिषद, रोजगार हमी योजना, पुरवठा विभाग, नगर रचना आदी शाखांमधील अधिकाऱ्यांना ई-प्रणालीचा अवलंब करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीला ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम झाले आहेत. याबाबत सर्व शाखांमधील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, कारकून, अव्वल कारकून यांचे स्वतंत्र सरकारी ई-मेल आयडी बनविण्यात आले आहेत. तसेच, प्रत्येकाची डिजिटल स्वाक्षरी तयार करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा ई ऑफिस प्रणालीच्या समन्वयक पल्लवी घाडगे यांनी दिली.

Vicky Deepak Chavan member of Sharad Mohol gang arrested
पुणे: शरद मोहोळ टोळीचा सदस्य विकीला पिस्तुलासह हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Thieves robbed college girl on Hanuman Hill escape are arrested
हनुमान टेकडीवर महाविद्यालयीन युवतीला लुटणारे चोरटे गजाआड, आरोपींकडून…
worker dies after falling from terrace case registered against contractor for negligence
गच्चीवरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल
Five former corporators of Thackeray group join BJP flexes against them started in Pune
ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश होताच त्यांच्या विरोधात पुण्यात लागले फ्लेक्स
Devendra fadanvis review meeting for msrdc ambitious Pune Ring Road and Jalna Nanded Expressway projects
पुणे वर्तुळाकार रस्ता आणि जालना-नांदेड महामार्गाच्या भूमिपूजनाला लवकरच मुहूर्त, उद्या मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत निर्णयाची शक्यता
Prostitution under name of massage parlor raid on massage parlor on Sinhagad road
मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सिंहगड रस्त्यावरील मसाज पार्लरवर छापा
Pedestrian bridge unused due to inconvenience Municipal Corporation neglects maintenance
‘पाऊल’ अडते कुठे? असुविधांमुळे पादचारी पूल वापराविना; देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष
Case filed against six people for vandalism and assault on hospital staff by relatives after patients death
रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून तोडफोड, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा
CM Devendra Fadnavis instructed pune municipal officials to implement seven point program
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना केल्या सूचना, म्हणाले…!

हे ही वाचा…कोरेगाव भीमा राष्ट्रीय स्मारकाचे काम कोणी रखडवले?

टपाल विभागाचे काम शंभर टक्के पूर्ण

ई-ऑफिस प्रणालीअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील टपाल विभागाचे काम शंभर टक्के पूर्ण करण्यात आले आहे. जुलै महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे विविध विभागांचे टपाल संगणकीकृत करून संबंधित विभागांकडे थेट पाठवले जात आहेत. त्यामुळे कोणत्या विभागासाठी कोणाचा अर्ज आणि कशासाठी आहे, याची माहिती तातडीने प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. या अर्जांवरील पुढील कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून, अंतिम निकालानंतर संबंधित नागरिकांना अर्जाची स्थिती आणि अंतिम निकाल सहज पाहता येणार आहेत.

हे ही वाचा…‘ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट’वर महाराष्ट्राची आघाडी… क्रेडिट्स नोंदवण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत

जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होणारे अर्ज, तसेच महसुली प्रकरणे, दावे, प्रलंबित निकाल आदींची माहिती वेळेवर प्राप्त करण्यासाठी कागदविरहित कामे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांमध्ये ई-ऑफिस प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. नववर्षात याचा अवलंब करण्यास सुरुवात करण्यात येणार असून, पारदर्शकता आणि गतिमानता हाच उद्देश असणार आहे. लवकरच इतर सरकारी कार्यालयांमध्ये या प्रणालीचा अवलंब करण्यात येईल. डाॅ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी

Story img Loader