पुणे : लोहगाव मार्गे पिंपरी-चिंचवडकडे जाणारा वर्तुळाकार मार्ग आणि महंमदवाडी येथील चोवीस मीटर रुंदीचे विकास आराखड्यातील दोन रस्ते क्रेडिट नोटच्या माध्यमातून सार्वजनिक- खासगी लोकसहभागातून (पीपीपी) विकसित केले जाणार आहेत. त्यासाठी दोनशे कोटींचा खर्च अपेक्षित असून त्याबाबतची निविदा प्रशासनाकडून काढण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकास आराखड्यात महापालिकेने रस्ते विकसनाला प्राधान्य दिले आहे. मात्र रस्ते विकसनाला मोठ्या प्रमाणावर खर्च येत असल्याने रस्ते रखडले आहेत. भूसंपादन हेही रस्ते विकसन रखडण्याचे मोठे कारण आहे. विकास आराखड्यातील रस्त्यांच्या रुंदीनुसार बांधकामांना परवानगी दिली जाते. त्यामुळे प्रत्यक्षात रस्ता अरुंद असला किंवा विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेल्या रस्त्याच्या रुंदीप्रमाणे रुंदी नसेल तरी बांधकामे उभी रहात असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे रखडलेले रस्त्यांचे काम सार्वजनिक खासगी लोकसहभागातून मार्गी लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार या तीन रस्त्यांसाठी दोनशे कोटींची निविदा काढली आहे.

हेही वाचा : पीकविमा भरपाईस कंपन्यांकडून दिरंगाई; सूचनांचे सर्वेक्षण, भरपाई निश्चितीचे कामही रखडले

गेल्या काही महिन्यांपासून रस्ते विकसित करणाऱ्या विकासकांना क्रेडिट नोटच्या माध्यमातून परतावा देण्यात येत आहे. या अंतर्गत बाणेर, मुंढवा, खराडी, गंगाधाम चौक येथील रस्ते आणि उड्डाणपुलाच्या कामाच्या सुमारे आठशे कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. आता मुंढवा येथे प्रत्यक्षात काम सुरू करण्यात आले आहे.महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी राज्य रस्ते प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येणाऱ्या वर्तुळाकार मार्गामधील महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या आणि नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यास उपयुक्त ठरणाऱ्या वाघोली-लोहगाव येथून पिंपरी चिंचवड पालिका हद्दीला जोडणाऱ्या ५.७ किलोमीटर लांबीचा आणि ६५ फूट रुंदीचा वर्तुळाकार मार्ग महापालिकेकडून विकसित केला जाणार आहे. या रस्त्यासाठी १७८ कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यासंदर्भातील निविदा प्रशासनाकडून काढण्यात आली आहे.

हेही वाचा : साखर कारखान्यांच्या काटामारीला लगाम; वजनकाटय़ांची फेरतपासणी करून संगणकीकृत करण्याचे आदेश

यासोबतच हडपसर परिसरातील महंदवाडी येथील सर्वेक्षण क्रमांक २६, २७ आणि ३७ मधील विकास आराखड्यातील रस्ते आणि सर्वेक्षण क्रमांक ३८,४०,४१,५५,५६ मधून जाणारा तीस मीटर रुंदीचा विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी २२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामाचीही निविदा प्रशासनाकडून काढण्यात आली आहे.