देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मजबूत आहोत. काही काळजी करू नका. एखाद्या जाहिरातीमुळे युतीवर परिणाम होणार नाही. ही युती एवढी कच्ची नाही. आम्ही आणि देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहोत. अस विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी लक्ष्मण जगताप, उमा खापरे, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पालिका आयुक्त शेखर सिंह यासह इतर नागरिक, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री आहे. मुंबईत मी नालेसफाई झाली की नाही हे अगदी स्पॉटवर जाऊन बघतो. राज्यात कुठं ही गाडी थांबव म्हटलं तरी रस्त्यावर थांबून मी प्रत्येकाला भेटतो. आजवर जगामध्ये असा मुख्यमंत्री तुम्ही कधी पहिला आहे काय का? असे एकनाथ शिंदे यांनी म्हणत अप्रत्येक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. पुढे ते म्हणाले, कोरोना काळातील सर्व निर्बंध उठवले. घाबरून घाबरून राहिलो असतो तर कोरोनाने आपल्याला धरलं असतं. आपण राज्यात सर्व सण- उत्सव खुले केले. त्यामुळं कोरोना पळून गेला.

Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ravindra Dhangekar met Deputy CM Eknath Shinde sparking rumors of joining Shinde group
मी वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेची भेट घेतली : माजी आमदार रविंद्र धंगेकर
Aniket Tatkare
अनिकेत तटकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा ‘गद्दारांचा बादशाह’ असा उल्लेख, महायुतीत जुंपली; मंत्र्याकडून राजीनाम्याची तयारी
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
Nitin Gadkari
Nitin Gadkari: “… तर मीच बुलडोझर घेऊन येतो”; नितीन गडकरींचा सज्जड दम, कारण काय?
DCM Eknath Shinde On Guardian Minister
Eknath Shinde : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत वाद? एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आम्ही…”

हेही वाचा >>> “पूर्वीचे सरकार ‘घरी’, आम्ही लोकांच्या दारी…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मला इगो नाही रस्त्यावरील कार्यकर्ता आहे. माझं आणि सरकारच एकच काम आहे. जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचे. हे सरकार शेतकऱ्यांच आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. पुढे ते म्हणाले, आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. हे सरकार खोटं नाही. मी रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री आहे. मुंबईत मी नालेसफाई झाली की नाही हे अगदी स्पॉटवर जाऊन पाहतो. राज्यात कुठं ही गाडी थांबव म्हटलं तरी रस्त्यावर थांबून मी प्रत्येकाला भेटतो. आजवर जगामध्ये असा मुख्यमंत्री तुम्ही कधी पाहिलंय का? पूर्वीच सरकार हे घरी होतं. आम्ही मात्र दारी येऊन काम करतो आहोत. देवेंद्र फडणवीस आणि आम्ही बजबुत आहोत. ही युती एवढी कच्ची नाही.

Story img Loader