Pune School Girl Sexual assault case: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाकडून सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वानवडी येथून उघडकीस आली. या प्रकरणी आता वानवडी पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली आहे. याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणातील आरोपीला काही स्थानिक राजकीय नेत्यांनी पळून जाण्यात मदत केल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हा आरोप केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असे लक्षात आले आहे की, स्थानिक काही नेत्यांनी त्याला पळून जाण्यात मदत केलेली आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मी काही राजकीय पक्ष वैगरे बघत नाही. आरोपी हा आरोपीच असतो. अशा आरोपीवर कडक कारवाई केली जाईल. तसेच आरोपीला मदत करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

chairperson state women commission rupali chakankar on alandi unauthorized warkari educational institution
आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर दोन दिवसांत करवाई करा; राज्य महिला आयोगाच्या सूचना
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
crime Uttar pradesh
क्रूरतेची परिसीमा! तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, डोळेही काढले; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप!
class 6 girl school raped in Porbandar
शिक्षकाचा सहावीतल्या विद्यार्थीनीवर बलात्कार; वाच्यता केल्यास खिडकीतून फेकण्याची दिली होती धमकी
IT girl murder, rape case, Mumbai,
विश्लेषण : मुंबईत आयटी तरुणी हत्या, बलात्कार प्रकरणात तपासातील त्रुटींमुळे आरोपी निर्दोष… नेमके प्रकरण काय होते?
Teacher gets 5 years in jail for molesting girls
अश्लील कृत्य करणाऱ्या शिकवणी चालकाला सक्तमजुरी
truth and dare rape news
पिंपरी : रावेतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Over 150 young women sexually abused by perverted counsellor
नागपूर : विकृत समुपदेशकाकडून दीडशेवर तरुणींचे लैंगिक शोषण; पीडितांमध्ये वकील, अभियंता…

हे वाचा >> पुणे: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाकडून शाळकरी मुलीवर अत्याचार, वानवडी पोलिसांकडून गाडीचालक अटकेत

या घटनेत आणखी काही पीडित मुली आहेत का? याचाही तपास केला जात आहे. या घटनेची माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाने मुलींना चुकीच्या पद्धतीने हात लावला. एका मुलीच्या पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर आणखी एका मुलीला त्याने अशाच प्रकारे हात लावल्याचे समोर आले आहे. म्हणून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थाचालकांनाही याप्रकरणी चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.

या माध्यमातून सर्व संस्था चालकांना आम्ही निर्देश देत आहोत की, त्यांनी त्यांच्या त्यांच्या शाळेतील वाहतूक व्यवस्थेवर अधिक लक्ष द्यावे. चालक आणि इतर कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्याबाबत योग्य माहिती ठेवावी, असेही ते म्हणाले.

पुणे पोलिसांनी संजय जेटींग रेड्डी (वय ४५, रा. वैदुवाडी, हडपसर) नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पीडीत मुलगी चार दिवसांपूर्वी शाळेतून घरी आली तेव्हा तिने वडिलांकडे तक्रार केली. वडिलांनी विश्वासात घेऊन मुलीकडे चौकशी केली. तेव्हा विद्यार्थी वाहतूक करणारे संजय अंकल यांनी अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली. संजय अंकल माझ्याबरोबर असणाऱ्या मैत्रिणीबरोबर अश्लील कृत्य करतात, अशी माहिती तिने वडिलांना दिली.

हे वाचा >> Veer Savarkar : “वीर सावरकर ब्राह्मण होते तरीही गोमांस खायचे, त्यांनी..” काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे नवा वाद

काँग्रेसकडून सावरकरांचा वारंवार अपमान

कर्नाटक सरकारमधील मंत्री दिनेश गुंडूराव यांनी वीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलेले आहे. या विधानाबाबत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “काँग्रेसकडून वारंवार वीर सावरकर यांचा अपमान केला जात आहे. गायीवर वीर सावरकरयांनी त्यांचे विचार मांडले आहेत. शेतकऱ्याला गाय ही कायमच कशी महत्त्वाची असते. त्यामुळे तिला मातेचा दर्जा दिला आहे, हे वीर सावरकर यांनी सांगितले. पण वीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधींनी चुकीची वक्तव्ये केली. काँग्रेसचे नेते हीच परंपरा पुढे नेताना दिसत आहेत.”

Story img Loader