भोसरीकरांचा आमदार महेश लांडगे यांच्यावर जोपर्यंत विश्वास आहे. तोपर्यंत महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही. असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते शनिवारी आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये बोलत होते. महेश लांडगे यांचं मतदारसंघातील व्यक्तींवर प्रेम आहे. असं देखील यावेळी त्यांनी नमूद केलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महेश लांडगे हे येणाऱ्या २३ तारखेला विक्रमी मताधिक्याने तिसऱ्या वेळेस निवडून येणार आहेत. लांडगे हे पहिलवान असले तरी हळवे आहेत. विरोधकांनी माझ्यावर केलेल्या टिकेनंतर ते हळवे झाले. पुढे ते म्हणाले, लांडगे यांनी विरोधकांवर टीका किंवा आरोप केलेला नाही. त्यामुळे चिंता करू नका ते पुन्हा एकदा निवडून येतील. असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, हिंदीमध्ये एक म्हण आहे. ‘कुत्ते भोके हजार हाथी चले बजार’ असे म्हणत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

हेही वाचा – बारामतीत अटीतटीचा सामना, अजित पवार की युगेंद्र… मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवार यांच्या सभेची चर्चा

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एलिव्हेटेड रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी

फेक नेरेटिव्ह पसरविणाऱ्यांना फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल आहे. २०१४ ते २०१९ दरम्यान थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. परंतु, २०२० आणि २१ मध्ये सत्ता गेल्यानंतर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. तेव्हा सुप्रिया सुळे यांचं सरकार होतं आणि गुजरात नंबर एकला होता. पुन्हा आमची सत्ता आली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. सध्या देशातील गुंतवणुकीपैकी ५२ % गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आहे. ही आकडेवारी आरबीआयची असल्याचं फडणवीस यांनी सांगितला आहे. त्यामुळे फेक नेरेटिव्ह पसरविणाऱ्याकडे लक्ष देऊ नका असं फडणवीस यांनी म्हटलं.