पुणे : लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर ती बंद पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र, ती बंद पाडू दिली नाही आणि योजना बंद होणारही नाही. महाविकास आघाडीतील सावत्र भावांचा बहिणींच्या पंधराशे रुपयांवर डोळा आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली. पर्वती विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. भाजपच्या उमेदवारांसाठीची फडणवीस यांची पुण्यातील ही पहिलीच सभा ठरली. राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारने पुण्याचा चेहरामोहरा बदलला आहे, असा दावाही फडणवीस यांनी यावेळी केला.

केंद्र आणि राज्य सरकार महिला केंद्रीत योजना राबिवत आहेत. मुलींना विनामूल्य उच्चशिक्षण, महिलांना एसटीच्या प्रवासात पन्नास टक्के सवलत, लखपती दिदी, लाडकी बहीण अशा योजना राबविल्या जात आहेत. लाडकी बहीण योजनेला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांनी मोठी टीका केली. ही योजना फसवी आहे, असे सांगितले. राज्यातील अडीच कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेचा निधी पोहोचल्यानंतर ही योजना बंद करण्यासाठी न्यायालयात काहीजण केले. पेैशांचा चुराडा होत असल्यामुळे योजना बंद करण्याची मागणी महाविकास आघाडीतील सावत्र भावांनी केली. त्यामुळे या सावत्र भावांनी राजकीय विरोध बाजूला ठेवून बहिणींना मिळणाऱ्या पंधराशे रुपयांवर डोळा ठेवू नये, असे फडणवीस यांनी सांगितले.

An attempt by the accused in the Bopdev Ghat case to mislead the police Pune news
‘बोपदेव घाट’ प्रकरणातील आरोपीकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ashwini Jagtap statement during Devendra Fadnavis meeting in Kalewadi for Shankar Jagtap campaign
चिंचवड: वाघ गेला, ही वाघीण पिल्लांना एकटं पडू देणार नाही; आमदार आश्विनी जगताप कुणाला उद्देशून म्हणाल्या?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
In Bhosari assembly former corporator Ravi Landge supported NCP candidate Ajit Gavane
भोसरी विधानसभा: बंडखोर रवी लांडगे आणि अजित गव्हाणे यांचं मनोमिलन भोसरीतील बंडखोरी शमली, रवी लांडगे उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेणार
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा >>>राज्यातील नऊ शिक्षण संस्थांना क्यूएस आशिया क्रमवारी जाहीर… कोणत्या शिक्षण संस्थांना स्थान?

ते म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर पुण्याचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली. पुण्यात मेट्रो यापूर्वीच सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, घोषणाबाज सरकारमुळे मेट्रो सुरू होऊ शकली नाही. वास्तव्यास सर्वोत्तम शहर असा पुण्याचा लौकिक झाला असून मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. नदीत थेट जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला असून समान पाणीपुरवठा योजनेमुळे सर्वांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. वाहतूक कोंडी ही पुण्याची सर्वात मोठी समस्या आहे. मात्र वर्तुळाकार मार्गामुळे ही समस्या दूर होणार आहे. त्यासाठी वीस हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून पुण्यातून अन्य शहरांकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी ५४ हजार कोटींचा आराखडा केला आहे. त्यामध्ये रस्ते, त्यावर दुमजली उड्डाणपूल तसेच मेट्रो मार्गिका असा समावेश असेल. पुण्याला आधुनिक आणि रोजगारक्षम करण्यात येत आहे.

सभेदरम्यान, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप नेत्या, आमदार पंकजा मुंडे, शिवसेनेचे (शिंदे) माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे (शिंदे) शहरप्रमुख नाना भानगिरे, रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनावणे यांच्यासह महायुतीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.