अतिवृष्टी या विषयामध्ये विरोधी पक्षांनी संवेदनशील असले पाहिजे. या विषयाचे राजकारण करणे योग्य नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विरोधी पक्षांवर टीका केली. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा केली जात आहे. त्यानुसार आम्ही योग्य ती काळजी घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

पंचनामे झाले नसल्याच्या विरोधी पक्षांच्या टीकेसंदर्भात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. तत्काळ पंचनाम्याचे आदेश आपण दिले आहेत. आता त्याची सुरुवात झाली आहे. थोडा काळ तर त्याला लागणार आहे. पण, याव्यक्तिरिक्त आम्ही हे सांगतो आहे, की शेतकऱ्याने नुसता फोटो जरी काढला तरी पंचनामा मंजूर करू. मला तर विरोधी पक्षाचे देखील आश्चर्य वाटते. कसब्यातील निकालावर चिंतन कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या अहवालासंदर्भात भाष्य करताना फडणवीस म्हणाले,की एखादी निवडणूक आपण जिंकतो किंवा हरतो याने फार काही फरक पडत नाही, असे मी मानतो. मात्र, कोणत्याही निवडणुकीच्या विजयानंतर किंवा पराजयानंतर आम्ही त्याचे मूल्यमापन किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं तर कारणमीमांसा करत असतो.

Mumbai municipal corporation
विश्लेषण : देशातल्या सर्वांत श्रीमंत महापालिकेला घरघर? मुंबई महानगरपालिकेच्या घटलेल्या मुदतठेवी चिंतेची बाब का?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Ulhasnagar loksatta news
उल्हासनगर : कर वसुली निम्म्यावर, पालिकेत तडकाफडकी बदल्या
governor c p radhakrishnan warns poor water quality in rivers like godavari threatens human life
गोदावरीसह काही नद्यांची अवस्था बिकट, राज्यपालांकडून चिंता
Shatrughan Sinha on non-vegetarian food ban
Shatrughan Sinha: ‘संपूर्ण देशात मांसाहारावर बंदी घाला’, शत्रुघ्न सिन्हांच्या मागणीमुळे तृणमूल काँग्रेस अडचणीत
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
air pollution issue ignore in in delhi assembly elections
‘शुद्ध हवा’ नावडे दिल्लीकरांना…

मुश्रीफांबाबत माहिती नाही
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाची कारवाई सुरू असल्याबाबत मला काही माहीत नाही. मला हे माध्यमांमधूनच पाहायला मिळाले, असे फडणवीस यांनी सांगितले.

Story img Loader