पुणे : राम मंदिराच्या उद्घाटनाचा कार्य़क्रम हा भाजपचा नाही. तो रामभक्तांचा, कारसेवकांचा आणि रामावर श्रद्धा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा कार्यक्रम आहे. श्रद्धा असलेला प्रत्येक जण या सोहळ्यासाठी जात आहे. याबद्दल कोणालाच दु:ख होण्याचे कोणतेच कारण नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मांडली.

पुणे भाजपच्या नवीन कार्यालयाला देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भेट दिली. त्यांनी कार्यालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राम मंदिर उद्घाटनाचा मुद्दा भाजपकडून लोकसभेच्या तयारीसाठी वापरला जात असल्याचा आरोप होत आहे. या निमित्ताने अक्षता वाटप सुरू असून निवडणुकीआधी भाजपचा घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जात आहे. याबद्दल विचारणा केली असता फडणवीस यांनी राम मंदिराचा कार्यक्रम भाजपचा नसून, राम भक्तांचा असल्याचे स्पष्ट केले.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Sharad Pawar On Dhananjay Munde
Sharad Pawar : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
sagar meghe and Sameer meghe
सागर मेघेंवर बंधूसह अन्य दोघांची जबाबदारी; हिंगण्यात हजेरी पण वर्धा, देवळीत प्रतीक्षाच
dcm devendra fadnavis praise obc community
भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे २२ जानेवारीला हे नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शनासाठी जात आहे. यावर उद्धव ठाकरे हे कुठल्याही मंदिरात चालले हेही नसे थोडके, अशी टिप्पणी फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या टीकेवर बोलताना फडणवीस यांनी पोलीस योग्य पद्धतीने काम करीत असल्याचे स्पष्ट केले.

ते म्हणाले की, त्यांचे गृहमंत्री कसे होते, त्यावेळी किती आलबेल होते, हे सगळ्यांना माहिती आहे. अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आले, शंभर कोटी रुपयांचे प्रकरण, साक्षीदार हत्या आणि वाझे प्रकरण त्यावेळी घडले होते.