देशात अराजकता कशी निर्माण होईल. यासाठी देश विदेशातील शक्तींनी षडयंत्र केलं. वोट जिहाद सारखे विषय मांडून आमच्या विचारांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, जेव्हा- जेव्हा संतांनी धर्म आणि समाज जागरण केल. तेव्हा- तेव्हा विजय झाल्याचं बघायला मिळालं. असं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीत केल आहे. देवेंद्र फडणवीस हे संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात बोलत होते. कुठे चुकलो तर समजावून सांगा. कधीही सत्ता आमच्या डोक्यात जाणार नाही. चुकलो तर आमचे कान धरा. संतच आम्हाला समजावून सांगू शकतात. आम्हाला कधीही वाटणार नाही. संत कोण होते आम्हाला सांगणारे. असे ही देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या समोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. देशात अराजकता कशी निर्माण करता येईल यासाठी देश विदेशातील शक्तींनी षड्यंत्र केलं. त्यांनी अराजकाची मांडणी केली. विविध भिंती मध्ये खंडित करता येईल. आमचं पौरुष कस समाप्त करता येईल. वोट जिहाद सारखे विषय मांडून एक प्रकारे आमच्या विचारांवर कस आक्रमण करता येईल. असा प्रयत्न आपल्या नजरेत आला. पुढे ते म्हणाले, जेव्हा- जेव्हा आमचा धर्म, संस्कृती, संस्कार कमजोर झाले त्या- त्या वेळी गुलामगिरीमध्ये गेलो. ज्या – ज्या वेळी संतांनी धर्म, समाज जागरण केलं तेव्हा दिग्विजयी भारत पाहायला मिळाला.

हेही वाचा…Rajan Salvi : “योग्यवेळी योग्य निर्णय घेणार”, ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांचं मोठं विधान; पक्ष बदलाचे दिले संकेत

पुढे ते म्हणाले, वोट जिहाद च्या भरवश्यावर आम्ही लोकसभा जिंकलो. आता विधानसभा जिंकू. त्यावेळी मात्र आता जर आपण जागे झालो नाही तर पुढचा प्रहार हा राजसत्तेवर नाही तर धर्मसत्तेवर आहे. अस वाटायला लागलं. संतांनी गावोगावी जागरण उभं केलं यातून हा आमचा विजय झाला. पुढे ते म्हणाले, कुठे आम्ही चुकलो तर तुमचा अधिकार आहे. तुम्ही कान धरू शकता. तुम्ही सांगू शकता. मी एवढंच निश्चितपणे सांगतो. कुठे चुकलो तर मार्ग दाखवा समजावून सांगा. कधीही सत्ता आमच्या डोक्यात जाणार नाही. आम्हाला कधी असं वाटणार नाही की संत कोण होते आम्हाला सांगणारे. आम्हाला माहिती आहे. संतच आम्हाला सांगू शकतात. याची खात्री आम्हाला आहे. चुकलो तर आमचे कान धरा. आम्हाला समजावून सांगा. आमच्या चुका आम्ही सुधारू आणि सन्मार्गाने चालण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करू असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis said a question mark raised on creating chaos after lok sabha elections kjp 91 sud 02