शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा रविवारी साखरपुडा झाला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा मुलगा मल्हार यांच्याशी पूर्वशीचा साखरपुडा झाला. राऊत यांच्या घरातील हे पहिले मंगलकार्य होते, त्यामुळे राजकीय वर्तुळातील सारेच लोक हजर होते. कार्यक्रमादरम्यान संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गळाभेट झाली. या गळाभेटीवरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. त्या गळाभेटीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शेतकरी आंदोलनावरून चंद्रकांत पाटील यांची शरद पवारांवर टीका, म्हणाले…

“आपल्या देशाची एक संस्कृती अशी आहे की दुश्मन जरी असला तरी तो दुश्मन नावाच्या आणि कामाच्या जागी असतो. एरवी आपण एकमेकांना खूप प्रेम देतो. संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस गेले हे चांगलंच आहे. त्यांनी जायला पाहिजेच होतं. स्वाभाविकपणे दोन मित्र भेटल्यानंतर त्यांचे दोन राजकीय विचार वेगळे असू शकतात पण गळाभेट ही प्रेमाची होती. कारण राजकारणात दुश्मनी कधीच नसते. उलट मैत्री असायला पाहिजे. शरद पवार यांच्यावर आम्ही टीका करतो. आम्हाला पाश्चिम महाराष्ट्रात जर काम वाढवायचे असेल, तर त्यांच्यावर टीका केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही. पण मी भेटल्यावर मात्र त्यांना वाकून नमस्कार करणारच, कारण ही आमची संस्कृती आहे”, असे पाटील म्हणाले.

लॉकडाउनमध्ये मदत न देण्याचं मोदी सरकारचं कारण ऐकून मन सुन्न झालं -रोहित पवार

“शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे प्रयत्न केंद्र सरकारने केले आहेत. याच्यापेक्षा केंद्र सरकारने आणखी काय करायला पाहिजे हे मलाही समजत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत हे कायदे पास झाले, त्यावेळी या कायद्याबाबत चर्चा झाली पाहिजे असं जर शरद पवार यांना वाटत होतं, तर त्या दिवशी त्यांनी राज्यसभेत हजर राहणं आवश्यक होतं. खरं तर आता शेतकऱ्यांना घरी जाण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला पाहिजे”, असं मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. शरद पवार यांनी शेतकरी कायद्याबाबत रविवारी रात्री एक ट्विट केले. त्या ट्विटबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली.