पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींना जागा वाटप करतेवेळी तारेवरची कसरत करावी लागल्याच पाहण्यास मिळाले.तर या प्रत्येक पक्षात इच्छुक मंडळींची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.त्यामुळे अनेक जागांवर बंडखोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.तर काही उमेदवारांनी पक्षाचा आदेश अंतिम मानत उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.तर इच्छुक मंडळी अद्याप ही नाराज असून याचा फटका पक्षाला निवडणुकीत बसू शकतो.
तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील आठ ही विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये भाजपकडे इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक होते.त्यामुळे या निवडणुकीत इच्छुक नेतेमंडळीना उमेदवारी नाकारल्याने,याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.ही बाब लक्षात घेऊन भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे,माजी खासदार संजय काकडे,माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,माजी आमदार जगदीश मुळीक या सर्व इच्छुक मंडळींची प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट घेतली.या भेटीवेळी केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर हे उपस्थित होते.
हेही वाचा…शिटी साठी बविआ ची उच्च न्यायालयात धाव
y
या भेटीनंतर भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की,मागील कित्येक वर्षांपासून कसबा मतदार संघात काम करीत आलो आहे.यंदा देखील विधानसभा निवडणुकीची तयारी केली होती.पण यंदा उमेदवारी मिळाली.त्यामुळे माझ्यासह कार्यकर्ते देखील नाराज होते.पण पक्षाच्या आदेशानुसार निवडणुकीत काही वेळात सहभागी झालो आणि आज भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरी येऊन भेट घेतली. कुटुंबातील सदस्या सोबत त्यांनी चर्चा केली.तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच सरकार आल्यावर तुमचा निश्चित सन्मान केला जाईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.