श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मंदिरावर तिरंगी फुलांची आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. मंदिर पहाटे ३ पासून दर्शनासाठी खुले करण्यात आले असल्याने भाविकांनी गर्दी केली आहे.
हेही वाचा >>>‘जी-२०’च्या जाहिराती करण्याचा ‘यूजीसी’चा फतवा; उच्च शिक्षण संस्थांच्या नियमित कार्यक्रमांवर ‘जी-२०’चे अतिक्रमण
आज पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत पद्मश्री उस्मान खान यांनी सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. त्यापूर्वी पहाटे ३ वाजता मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.