पिंपरी: कोणताही देव मोठा नसतो. तर, त्या देवाचे भक्त मोठे असतात. श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज हे भगवान श्रीगणेशाचे भक्त होते. आज जिथे गणपती आहे, तिथे मोरया महाराज आहेत. हा भक्तीचा महिमा आहे, असे मत श्री भगवानगड संस्थानचे प्रमुख मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सवास शुक्रवारपासून सुरुवात झाली. शास्त्री यांच्या हस्ते शुक्रवारी महोत्सवाचे उद्घाटन झाले. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव, आमदार उमा खापरे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा… राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला जाणार की नाही? रामदास आठवले म्हणाले, ‘मला अद्याप निमंत्रण…’

नामदेव शास्त्री म्हणाले की, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने श्री मोरया गोसावी महाराज मंदिराचे खूप महत्त्व आहे. मोरया गोसावी महाराजांचे नाव अजरामर आहे. मंगलमूर्ती मोरया असे म्हटल्याशिवाय आपल्या कोणत्याही कामाची सुरुवात होत नाही. श्रेय (ज्ञान) आणि प्रेय (भौतिक) अशा दोन प्रकारचे जग आहे. साधू, संत, महंत हे श्रेयाच्या जगात येतात. ज्ञानियांकडे ज्ञान मागितले पाहिजे. ज्ञानाशिवाय त्यांच्याकडून काहीही मिळणार नाही.

पिंपरी-चिंचवड शहर हे मोरया गोसावी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. त्यामुळे या शहरात काम करताना खूप आनंद मिळतो, असे आयुक्त सिंह म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devotees of the god are great shriman mahasadhu shri morya gosavi maharaj was a devotee of lord shri ganesha said namdev shastri pimpri pune print news ggy 03 dvr