लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : जादूटोण्याच्या संशयातून एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना भोर तालुक्यातील हातवे खुर्द गावात घडली. खून केल्यानंतर मृतदेह गुंजवणी नदीच्या पुलाजवळील नदीपात्रात फेकून देण्यात आला होता.आरोपीने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अपघाताचा बनाव रचल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.

Heavy rain in Miraj taluka sangli
सांगली: मिरज तालुक्यात मुसळधार पाऊस, एकजण पुरात गेला वाहून
25th September Rashi Bhavishya & Panchang
२५ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य: ग्रहमानाच्या साथीने दिवस…
pune police arrested gang who preparing for robbery in hotel in khadakwasla area
दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड- पिस्तूल, काडतुसे, कोयते जप्त
class 10 student ran away to boyfriends house
सातारा: तृतीयपंथीयाच्या खुनाचा तपास सहा तासांत उघड
Nashik leopard attack, Nashik, Child died leopard attack,
नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू
ST bus washed away in flood water in Parbhani
परभणी : पुराच्या पाण्यात एसटी बस गेली वाहून, मानवत तालुक्यातील घटना
Two brothers drowned, Nandurbar taluka,
नंदुरबार तालुक्यात दोन भावांचा बुडून मृत्यू
man killed in tiger attack, Bhandara District,
वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; भंडारा जिल्ह्यातील घटना

स्वप्नील ज्ञानोबा खुटवड (वय ३०, रा. हातवे खुर्द, रा. भोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गणपत गेनबा खुटवड (वय ५२, रा. हातवे खुर्द, ता. भोर) असे खून झालेल्याचे नाव आहे. गणपत यांच्या डोक्यात रविवारी (२२ सप्टेंबर) दगड घालून खून केल्याची कबुली आरोपी स्वप्नीलने दिली आहे. गणपत हे गावात देवऋषी म्हणून ओळखले जात होते. ते किराणा माल विक्रीचे दुकान चालवायचे. स्वप्नील आणि गणपत नातेवाईक आहेत. गणपत जादुटोणा करत असून त्यांच्यामुळे प्रगती होत नसल्याचा संशय आरोपी स्वप्नीलला होता. जादुटोण्याच्या संशयावरुन त्याने गणपत यांचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजगड पोलिसांच्या पथकाने याप्रकरणाचा तपास केला.

आणखी वाचा-ज्येष्ठाला मोहजालात अडकावून खंडणी प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक बडतर्फ

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमगर, राजेंद्र गवळी, सहायक निरीक्षक दत्ताजी मोहिते, कुलदीप संकपाळ, अमोल शेडगे, तुषार भोईटे, मंगेश भगत, सागर नामदास, राजू मोमीन अतुल डेरे, बाळासाहेब खडके यांनी ही कारवाई केली.

खूनाचा छडा असा लागला

हातवे बुद्रुक गावाजवळ गुंजवणी नदीच्या पुलाजवळ नदीपात्रात गणपत यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांची दुचाकी पुलाच्या कठड्याला अडकवून ठेवण्यात आली होती. अपघातात गणपत यांचा मृत्यू झाल्याचा बनाव आरोपीने रचला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गणपत यांच्या डोक्याला झालेली जखम पोलिसांनी पाहिली. तेव्हा पोलिसांचा संशय बळवला. सुरुवातीला राजगड पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर समांतर तपास करत होते. हातवे बुद्रुक गावात पोलिसांनी चौकशी केली. आरोपी स्वप्नीलचा गणपत यांच्याशी काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. वादातून त्यांनी खून केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली.