पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. तर मराठा आरक्षणाची मागणी मान्य होत नाही. तोपर्यंत राज्यातील अनेक गावांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकानी राजकीय नेत्यांना बंदी घातली आहे. त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्या सर्व घडामोडी दरम्यान पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांनी मेळाव्याला येण्याचं टाळलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा हायस्कूलच्या मैदानावर युवकांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना नियुक्तीचे पत्र देणार होते. त्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली होती.

martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
share market Major indices, share market ,
स्फुरणाअभावी निर्देशांकांना सुस्ती
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
nada update on hima das suspension creates confusion
हिमा दासच्या निलंबन कालावधीवरून गोंधळ
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास

आणखी वाचा-रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा तात्पुरती स्थगित, मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी निर्णय

या कार्यक्रमाच्या ठिकाणी सायंकाळी सहा वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी जमण्यास सुरुवात केली होती. तर या कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तुषार काकडे हे नागरिकांमध्ये जाऊन बसल्याचे कार्यकर्त्यांना दिसले. राज्यातील अनेक भागात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक खासदार, आमदार आणि मंत्र्यांच्या कार्यक्रमांना विरोध दर्शवित आहेत. त्यामुळे आयोजकांनी तुषार काकडे यांना बाहेर जाण्यास सांगितले.

यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना तुषार काकडे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. मात्र कोणत्याही प्रकारचा निर्णय राज्य सरकारला घेता आला नाही. त्यामुळे राज्यातील मराठा समाज अधिक आक्रमक झाला असून ठिकठिकाणी साखळी उपोषण, आंदोलन करण्यात येत आहे. अनेक गावामध्ये मंत्र्यांना बंदी घालण्यात आली आहे. तर त्याच दरम्यान आज पुण्यात धनंजय मुंडे हे कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे मी या ठिकाणी आलो. पण आयोजक आणि पोलिसांना वाटले की, मी येथे काही करेल, त्यामुळे मला बाहेर काढले आहे. मात्र आम्ही जोवर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत कोणत्याही पक्षाचा नेता असो की मंत्री आम्ही त्यांचा निषेध करणार, आता कोणालाही सुट्टी नाही. असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

Story img Loader