धनंजय मुंडे यांची मागणी
भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या केवळ राजीनाम्याने भागणार नाही तर त्यांच्यावरील सर्व आरोपांची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी येथे पत्रकाराशी बोलताना केली. खडसे यांच्याप्रमाणेच मंत्रिमंडळातील अन्य भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी मुंडे यांनी केली.
खडसे यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया देताना मुंडे म्हणाले, की नैतिकतेच्या मुद्यावर खडसे यांना राजीनामा घ्यायचा होता तर इतका विलंब का करण्यात आला. प्रथमदर्शनी खडसे दोषी आहेत हे स्पष्ट होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस खडसे यांचा राजीनामा घेतात आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे खडसे त्यांना पािठबा देतात, यावरून भाजपाची दुटप्पी भूमिका दिसून येत आहे.
खडसे यांना क्लीन चिट देऊन भाजपा भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे आणि राजाश्रय देत आहे, असाही आरोप मुंडे यांनी केला.

Story img Loader