राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांचे बीड लोकसभा मतदारसंघातील विश्वासू सहकारी बजरंग सोनवणे यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी बीड लोकसभा मतदारसंघातील बजरंग सोनवणे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.        

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘… अन्यथा विद्यापीठे, महाविद्यालये मागे पडतील’; राज्यपाल रमेश बैस यांचा इशारा

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की,बजरंग सोनवणे यांनी बीडमध्ये आपली ताकद वाढवण्याचे काम आपण केलं.नवीन चेहरे, तरुणांना संधी देण्याचं काम पवार साहेब करत आहे.त्यामुळे आपल्या पक्षात बजरंग सोनवणे यांच स्वागत करतो. आपण सगळे काही दिवस म्हणत होतो की,सोनवणे आपल्या पक्षात येणार हे ऐकत होतो.पण मी सगळ्यांना सांगत होतो ते आपल्यातच आहेत. आपला पक्ष फुटल्यानंतर मला ते चार पाच वेळा भेटले असल्याचे त्यांनी सांगितले.  

हेही वाचा >>> “विजय शिवतारे यांनी अजित पवारांची माफी मागावी अन्यथा…”; मावळमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा    

तसेच ते पुढे म्हणाले,आमदार निलेश लंके यांनी कोविड काळातील अनुभव असे एक पुस्तक लिहिले आहे.त्या पुस्तक प्रकाशन सोहोळ्याचा कार्यक्रम याच कार्यालयात मागील आठवड्यात झाला होता.त्या कार्यक्रमामधून निलेश लंके नी बाध फोडलेला आहे. पाणी व्हायला सुरुवात झाली आहे.बांध फुटयला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक जण हळूहळू येण्यास सुरुवात करणार आहे. काही जण (निलेश लंके) पवार साहेबांच्या जवळ बसून फोटो निघाला तरी त्यांच्या अपात्रतेची कारवाई सुरू होते.अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला.     तसेच ते पुढे म्हणाले की,तुम्ही आता हातामध्ये गदा घेऊन कामाला लागायच,तुम्हाला कोणाचाही फोन आला.आता येईल किंवा थोड्या वेळाने येईल.पवार साहेब गाडीमध्ये बसल्यावर तुम्हाला फोन येईल.त्यामुळे तुम्ही त्यांना सांगा,तुम्ही पण या अशा शब्दात अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde loyalist bajrang sonawane join sharad pawar ncp in presence of state president jayant patil svk 88 zws
Show comments