शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाल्याचा आरोप महाविकास आघाडी नेत्यांकडून करण्यात आला आहे. या आरोपावरुन करुणा मुंडेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. चुकीची कारवाई अनेकांवर झाली. माझ्या गाडीमध्ये तर पिस्तूल ठेवण्यात आलं होत. त्यावेळी कोणत्याही महिला नेत्यांनी भूमिका मांडली नाही. १६५ आमदारांचे संख्या बळ असताना. पहिल्यांदा सरकार पडले. माझे पती (धनंजय मुंडे) आमच्या दोघांमध्ये त्याच दरम्यान भांडण सुरू होती. हे सरकार देव आला तरी पडू शकत नाही. असं ते म्हणायचे ( धनंजय मुंडे ) पण एका महिलेच्या तळतळाटने महाविकास आघाडी सरकार पडले, अशा शब्दात करुणा मुंडेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला .
अब्दुल सत्तार, संजय राठोड यांना पक्षातून काढलं पाहिजे
राज्य सरकारच्या कामावर आपण समाधानी आहात का ? या प्रश्नावर करुणा मुंडे म्हणाल्या याच सरकारमधील मंत्री महिला नेत्यावर आरोप प्रत्यारोप करीत आहे. त्या प्रश्नावर करुणा मुंडे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे हे चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. पण अब्दुल सत्तार, संजय राठोड सारख्या मंत्र्यांना पक्षातून काढल पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.
पाहा व्हिडीओ –
नरेंद्र मोदी यांनी देशाला जोडण्याच काम केलं
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे बाबत करुणा मुंडे यांना प्रश्न विचारला असता. त्या म्हणाल्या की, राहुल गांधी यांच्याकडे कोणताही अजेंडा नसताना. ते विनाकारण चालत जात आहेत. राहुल गांधी यांनी काहीतरी मुद्दे घेऊन जनतेच्या समोर जायला पाहिजे होते. मात्र, भारत जोडोची गोष्ट म्हणाल, तर नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये सर्वाधिक जागा जिंकून (३६५ जागा जिंकून ) देशाला जोडले आहे. मोदींनी तुटलेला भारत जोडण्याचं काम केलं आहे. त्यामुळे राहुल गांधी कोणता भारत जोडण्याच प्रयत्न करीत आहेत, असा सवालही त्यांनी विचारला.
राजकीय घराणेशाही विरोधात लढा देणार
राज्यातील प्रत्येक राजकीय पक्ष आपापली खुर्ची सांभाळताना दिसत आहे. या राजकीय लोकांना आपली मुलं आणि मी एवढचं दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही येत्या काळात सर्व सामान्य शेतकरी, बेरोजगारी, चांगल शिक्षण मिळाल पाहिजे.तसेच त्यात प्रामुख्याने राजकीय घराणेशाही विरोधात लढा देणार आहे. कार्यकर्त्यांनी केवळ वडापाव खायचा आणि सतरंजी उचल्याची का असा सवाल करुणा मुंडे यांनी उपस्थित करीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केल.