बारामती : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीने जोर धरला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील २८८ आमदार आणि ४८ खासदारांच्या घरापुढे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाकडून देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> बागेश्वर महाराज यांच्या सत्संगामुळे संगमवाडी परिसरात वाहतूक बदल, खासगी बस थांबा तात्पुरता स्थलांतरित

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानाच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून बारामती येथे चंद्रकांत वाघमोडे उपोषणाला बसले असून, त्यांच्या उपोषणाचा रविवारी अकरावा दिवस होता. उपोषणाकडे लक्ष न दिल्याने धनगर समाज आक्रमक झाला असल्याचे दिसून येत आहे. पुढच्या टप्प्यात राज्यातील आमदार आणि खासदारांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.