लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली.
घाटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. साने गुरुजी तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक अभिनव तसेच सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांनी पक्ष संघटनेत सुद्धा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या असून सध्या ते पुणे शहर प्रभारी आणि प्रदेश चिटणीस म्हणून काम पाहत होते.
हेही वाचा… पुणे: चित्रपटगृहात महिलेशी अश्लील वर्तन; तिघे अटकेत
भाजपची शहरात मोठी ताकद आहे. आगामी सर्व निवडणुका जिंकून पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करणार आहे. या पदाचा वापर हा सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात येईल. पक्षसंघटना मजबूत बांधून ती एकसंध टिकवून ठेवणार असल्याची प्रतिक्रिया धीरज घाटे यांनी दिली.