बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्रात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अनेक संघटना आक्रमक झाल्या. तसेच त्यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या दाव्याला आव्हानही दिलं. या पार्श्वभूमीवर धीरेंद्र शास्त्रींनी बुधवारी (२२ नोव्हेंबर) देहूत जाऊन संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी पत्रकारांनी धीरेंद्र शास्त्रींना संत तुकाराम महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या चुकीची जाणीव झाली का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी त्यांची भूमिका मांडली.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, “मी तेव्हा एक लेख वाचला होता. त्या लेखाच्या आधारे मी त्या भाषेत बोललो होतो. त्याआधीही मी महाराष्ट्रात आलो होतो. त्यामुळे मला संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी माहिती आहे. मी त्यांच्याविषयी जेवढं शक्य होतं तेवढं वाचलं आहे. मी असं कधीही कोणत्याही संताविषयी म्हटलेलं नाही.”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Loksatta lalkilla Amit Shah statement of Congress defeat
लालकिल्ला: अमित शहांचे काँग्रेस पराभवाचे सत्यकथन!
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान

“माझ्या बोलण्यात काही दोष असेल तर…”

“तेव्हा बोलताना माझ्यावर स्थानिक भाषेचा प्रभाव होता. कुणी साखर म्हणतं, तर कुणी शुगर म्हणतं. त्यामुळे मी निश्चितपणे स्वीकारलं की, माझ्या बोलण्यामुळे वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांना मानणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या. माझ्या बोलण्यात काही दोष असेल तर, तो मी स्वीकारला आणि सुधारणा केली,” असं मत धीरेंद्र शास्त्रींनी व्यक्त केलं.

“मी भारत हिंदूराष्ट्र व्हावं हा संकल्प घेऊन निघालो आहे”

“मी आचार्य परंपरेचा साधक आहे. असा व्यक्ती कोणत्याही संताचा विरोध करेल असं होणार नाही. तसेच असा विरोध करणारा संतांचा अनुयायी होऊच शकत नाही. मी भारत हिंदूराष्ट्र व्हावं हा संकल्प घेऊन निघालो आहे. त्यामुळे मी संत महात्म्यांची प्रशंसा करण्याऐवजी विरोध करत असेल, तर पाश्चिमात्य संस्कृतीचे संस्कार आमचा हा प्लॅनच गिळून टाकतील. म्हणूनच मी हात जोडून संपूर्ण वारकरी संप्रदायासमोर खेद व्यक्त केला होता,” असंही धीरेंद्र शास्त्री यांनी नमूद केलं.

“तुकारामांच्या तपस्येमुळे ते अभंग नदीत तरंगले”

धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “मी संत तुकाराम महाराजांच्या शीलेचं दर्शन घेतलं. त्यांनी आपले अभंग इंद्रायणी नदीत सोडून दिले होते. मात्र, संत तुकारामांच्या तपस्येमुळे ते अभंग नदीत बुडाले नाहीत. त्यांना पाण्याचा स्पर्शही झाला नाही आणि ते पाण्यावर तरंगले. ही संतांची परंपरा आहे.”

हेही वाचा : धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे संत तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान; म्हणाले “त्यांची पत्नी…”

“भारत हिंदूराष्ट्र होईल”

“भारत अद्भूत देश आहे. या संतांचा आशीर्वाद कायम राहिला, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न संपूर्ण भारतात यशस्वी होईल. तसेच भारत हिंदूराष्ट्र होईल, अशीच प्रार्थना मी केली आहे,” असंही धीरेंद्र शास्त्रींनी नमूद केलं.

Story img Loader