ढोल-ताशा पथकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेची प्रथम फेरी १० व ११ सप्टेंबरला कृष्णसुंदर गार्डन येथे होणार आहे. संकेत गलांडे आणि प्रथमेश गाडवे हे या स्पर्धेचे निमंत्रक असून स्पर्धेतील सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आतापर्यंत या स्पर्धेसाठी ३५ पथकांनी नोंदणी केली आहे. १० व ११ तारखेला होणाऱ्या स्पर्धेच्या प्रथम फेऱ्या सायंकाळी ५ ते १० या वेळात कृष्णसुंदर गार्डन येथे होतील, तर १२ तारखेला सायंकाळी ५ वाजता शनिवारवाडा येथे स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. अंतिम फेरीसाठी ६ पथकांची निवड केली जाणार असून प्रथम क्रमांकाच्या विजेत्या पथकास १ लाख रुपये, तर द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार व २५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. पथकांनी अधिक माहितीसाठी ९९७५५४७४७४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Story img Loader