चिन्मय पाटणकर chinmay.reporter@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अभिनेता गिरीश परदेशी ‘हॅश अर्नेस्टो टॅग गव्हेरा’ या नाटकात क्युबाच्या क्रांती संग्रामातला नेता चे गव्हेराची भूमिका करत आहे. त्याशिवाय त्यानं ‘जस्ट असॅसिन्स’ हे नाटक दिग्दर्शितही केलं आहे. ही नाटकं दिल्ली, लखनऊ आणि कलकत्त्यातील महोत्सवात निवडली गेली आहेत. या निमित्तानं गिरीश परदेशीसह साधलेला संवाद..
* ‘हॅश अर्नेस्टो टॅग गव्हेरा’ हे नाटक काय आहे?
– हे नाटक चे गव्हेराच्या जीवनावर किंवा त्यांच्या आदर्शवादावर आधारित नाही. साहित्यात मॅजिक रिअॅलिझम ही एक शैली आहे. भारतीय साहित्यात अनेक ठिकाणी किंवा आपल्या मराठीत व. पु. काळेंच्या अनेक कथांमध्ये मॅजिक रिअॅलिझमचा वापर केला आहे. वास्तवात नसलेले वास्तवात आहे अशा पद्धतीने विषयाची मांडणी केली जाते. १९६७ मध्ये मारला गेलेला चे गव्हेरा आताच्या भारताच्या परिस्थितीत, उत्तर भारतातल्या एका खेडय़ातल्या पोलीस ठाण्यात आढळून आला. त्याला पकडलं गेलंय, तो चे गव्हेरा आहे की नाही या बाबतही संदिग्धता आहे आणि तो चे गव्हेरा असल्याचं पसरवलं जातंय, तर काय होईल हे नाटकात दाखवण्यात आलं आहे. चे गव्हेराला मारल्यानंतर त्याचं काय झालं हे कुणाला माहीत नाही. माझा राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातलाच मित्र शुभदीप राहानं हे नाटक दिग्दर्शित केलं आहे.
* चे गव्हेराची भूमिका करण्यातलं काय आव्हान होतं?
– खूप कठीण होतं, कारण मी स्पॅनिश बोलतोय या नाटकात. हिंदी आणि इंग्रजी मी स्पॅनिश शैलीत बोलतोय. स्पॅनिशचा तो लहेजा आणणं कठीण होतं. दक्षिण अमेरिकेतल्या लोकांमध्ये, उदाहरणार्थ मॅरेडोना किंवा पेले यांच्यात जो अंगभूत आक्रमकपणा असतो, तो त्यांच्या वावरण्यात, बोलण्यात, शारीर भाषेत दिसतो, त्याचा अभ्यास करूया असं माझ्या दिग्दर्शकानं मला सांगितलं. त्यानुसार मला त्याचा अभ्यास करावा लागला. चे गव्हेराच्या भाषणांच्या चित्रफिती पाहिल्या, पुस्तकं वाचली. चे गव्हेरा हे खूप वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. त्याच्याबद्दल दोन टोकाची मतं आहेत. म्हणजे काही लोक चे गव्हेराला, त्याच्या विचारसरणीला खूप मानतात, तर काही लोक खूप टीका करतात. त्यामुळेच चे गव्हेरा या व्यक्तिमत्त्वाचं व्यावसायिकीकरणही खूप झालं. उदाहरणार्थ, टी शर्टवर छबी छापणे वगैरे.. त्यानं काय केलं, साम्राज्यवादाशी कसा लढला ते फार लोकांना माहीत नाही. त्यामुळे आपल्यासमोर असलेल्या चे गव्हेराच्या पलीकडे जाऊन त्याचं खरं रूप जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.
* हे नाटक आजच्या काळाशी कशा पद्धतीने सुसंगत आहे?
– नाटकाची गोष्टच आजच्या काळात घडते. त्यामुळे ते आजच्या काळाशी सुसंगत असंच नाटक आहे. हे नाटक आम्हाला मुद्दामच चरित्रात्मक करायचं नव्हतं किंवा चे गव्हेराच्या विचारसरणीचं समर्थन करणारंही करायचं नव्हतं. कारण, आज कुठली विचारसरणी मानावी हाही प्रश्नच आहे. कुठल्याही विचारसरणीचा प्रचार करायचा नाही ठरवलेलंच होतं. बंगालमध्ये आम्ही या नाटकाचे प्रयोग केले, तेव्हा खूप कमाल प्रतिसाद मिळाला होता.
* एकीकडे अभिनेता म्हणून काम करताना तू ‘जस्ट असॅसिन्स’ हे नाटक दिग्दर्शितही केलं आहे. त्याविषयीही सांग..
– नोबेल पुरस्कारप्राप्त लेखक, विचारवंत अल्बर्ट कामूचं ‘जस्ट असॅसिन्स’ हे नाटक हिंदीमध्ये सुरेश भारद्वाज आणि दीपा साही यांनी रूपांतरित केलं आहे. कामूचं वैशिष्टय़ म्हणजे, त्यानं त्याच्या साहित्यातून अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. जीवन काय आहे, जगण्याचा उद्देश काय याचा शोध प्रत्येक माणूस घेतो. पण हे क्षणिक आहे असं मला वाटतं. कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ध्येय होत असतात. हे नाटक हिंदीमध्ये रूपांतरित करताना त्याला स्वातंत्र्यपूर्व काळाचा संदर्भ दिला आहे. क्रांतिकारकांना आयुष्याचं ध्येय काय, क्रांती मिळवून करणार काय, आयुष्याचं समाधान कसं मिळेल, याचा विचार ते करतात. या सगळ्याची नाटय़मय पद्धतीने मांडणी केली आहे. ‘जस्ट असॅसिन्स’ हे कामूचं नाटक भारतात फार कमी वेळा झालं आहे. नाटकाची गोष्ट स्वातंत्र्यपूर्व काळाची असली, तरी ते आजच्या काळातही लागू पडतं. आजपर्यंत मी अभिनेता म्हणून काम केलं, पण दिग्दर्शन करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.
* तू अभिनेता म्हणून चित्रपट, व्यावसायिक नाटकं करत असताना प्रायोगिक नाटकांसाठी कसा वेळ काढतोस?
एवढी वर्ष काम केल्यानंतर आता मला माझ्या आवडीनुसार काम करण्याची, काय भूमिका करायच्या हे ठरवण्याची संधी मिळू लागली आहे. सुरुवातीच्या काळात मालिका, चित्रपट मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते.
आता तसं करावं लागत नाही. प्रत्येक नटाची क्षमता प्रत्येक कलाकृतीमध्ये वापरलीच जाते असं होत नाही. त्यामुळे मी खूप निवडक, मला आवडेल असं काम करण्याचा प्रयत्न करतो. शिवाय नाटय़प्रशिक्षण घेतो, काही ठिकाणी शिकवतो.