लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : यंदाच्या गणेशोत्सवामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला सॉलिटेरियो डायमंड्सतर्फे ५० लाख रुपये किमतीच्या हिऱ्याचा तिलक (टिळा) अर्पण करण्यात आला आहे. गणरायाच्या शुंडाभूषणामध्ये बसविण्यात आलेल्या या टिळ्यामुळे गणरायाचे रूप अधिकच विलोभनीय दिसत आहे.

सॉलिटेरियो डायमंड्सचे मालक आणि प्रसिद्ध अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी गणरायाचे दर्शन घेत हा तिलक अर्पण केला. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अमोल चव्हाण या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-‘हे खा’, ‘ते खा’ सांगणे म्हणजे धर्म नव्हे, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मत

सॉलिटेरियो डायमंड्सतर्फे १२ दिवस हा ६६ कॅरेट हिऱ्याचा तिलक साकारण्याचे काम सुरू होते. गणरायाच्या आभूषणांपैकी असलेल्या शुंडाभूषणाच्या वरच्या बाजूला हा तिलक लावण्यात आला आहे. कारागिरांनी तब्बल दीडशे तास काम करून कलाकुसरीने हिऱ्याचा तिलक साकारला आहे. गणेशोत्सवात भाविकांना हा हिऱ्याचा तिलक पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.