पुणे : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शहरातून एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिबवेवाडी भागात सोमवारी सायंकाळी सहा ही घटना घडली. अपहरण झालेल्या हिरे व्यापाऱ्याच्या पत्नीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हिरे व्यापारी बिबवेवाडी भागातील एका सोसायटीत राहिला आहेत.ते हिरेजडीत दागिने करतात. सोमवारी सायंकाळी व्यापारी आणि त्यांची पत्नी मुलीला शाळेतून आणण्यासाठी सॅलिसबरी पार्क परिसरात गेले होते. शाळेतून घेतल्यानंतर मुलगी आणि पत्नीला घरी सोडले. काही कामानिमित्त लष्कर भागात जाणार असल्याचे सांगितले.

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास व्यापाऱ्याच्या पत्नीच्या मोबाईलवर संपर्क साधण्यात आला. अनोळखी व्यक्तीने “मैने आपके पति को उठाया है, दो करोड तयार रखो, आपके ससुर जी को बोलो, दो घंटे मे फोन करेंगे” असे म्हणत जिवेमारण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या पत्नीने तातडीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, निखिल पिंगळे, विवेक मासाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

तपासादरम्यान सोमवारी सायंकाळी व्यापारी नवले पूल परिसरात असल्याचे तांत्रिक तपासात आढळून आले. नवले पूल परिसरात व्यापाऱ्याची दुचाकी सापडली. व्यापाऱ्याने काही जणांकडून पैसे घेतले होते अपहरण प्रकरणाचा तपास करण्यात येत असून आर्थिक वादातून आपण करण्यात आल्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Story img Loader