राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधकांवर टीका करताना त्यांना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री नाहीत, याचा काही क्षण विसर पडल्याचे दिसून आले. मात्र, यानंतर लगेचच त्यांना बोलण्याचा ओघात आपली चूक झालेचे लक्षात येताच त्यांनी फडणवीस यांचा बद्दल बोलताना माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी आणि भाजपाच्या काही नेत्यांच्या फोन टॅपिंग संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला चाकणकर उत्तर देत होत्या. तेव्हा बोलण्याच्या ओघात त्यांनी किमान तीनवेळा केवळ मुख्यमंत्री असाच फडणवीस यांच्या संदर्भात उल्लेख केल्याचे दिसून आले. मात्र, चूक लक्षात येताच त्यांनी माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला.

चाकणकर म्हणाल्या, त्यांच्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री मोहदय हातात जर बुट घेऊन उभे राहत असतील, तर चोरांच्या टोळीत आपण बसलोय की काय? असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल. त्यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत की त्यांना त्यात त्यांच्याच लोकांची भीती वाटत आहे. कदाचित त्याच्यामुळेच त्यांच्याच लोकांचे फोन टॅपिंग ते करत असतील. याबद्दल फार काही बोलायचं नाही. तसेच, एक फोटो जिथं आंदोलनाचं आपण समर्थन करण्यासाठी गेलोय, जनमानसाची, विरोधकांची भूमिका आपण निभावतोय, अशावेळी काय संदेश द्यावा हा फार महत्वाचा होता. पण, गेल्यापासून स्वतः चेच बूट हातात घेऊन त्यावर लक्ष केंद्रीत करणारे मुख्यमंत्री म्हणातच त्यांना आपली चूक लक्षात आली व त्यांनी माजी मुख्यमंत्री असा उल्लेख करत, माजी मुख्यमंत्र्यांना आपली जबाबदारी काय आहे हे अजून समजलं नसल्याचे सांगितले.

पुढे त्या म्हणाल्या, देशाच्या सुरक्षतेचा संदर्भात हेरगिरीचा विषय येतो, तेव्हा फोन टॅपिंग करावं हे अपेक्षित आहे. पण, ज्यांनी समाजासाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी योगदान दिलं आहे. अशा नेत्यांचे जर फोन टॅप करत असाल, तर दुसऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? असा प्रश्न चाकणकर यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, फोन टॅपिंग कशासाठी करताय? ही मानसिक विकृती आहे. सत्तेत असताना तुम्ही सत्तेचा गैरवापर केला असेल तर मला अस वाटत यासंदर्भात मागणी केली आहे की, ज्यांची चौकशी होते त्यांनी चौकशीला समोर जावं. जे निर्दोष असतील त्यांना घाबरण्याचे कारण नाही.